तुम्ही लॉकडावून करताय का मरणं विकताय ?
The Issue
लॉकडावून
हा शब्द सुद्धा आता कित्येकांच्या जीवात धडकी भरवत असेल, आज साताऱ्यात माननीय जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी परत 10 दिवसांसाठी लॉकडावून जाहीर केले. सर्वकाही पूर्ण बंद.पण आमच्यासाठी ते तर 5 एप्रिल पासूनच बंद आहे. तरीही कोरोना केसेस वाढतच आहेत. कित्येक जणांना उपाशी रहावे लागत आहे, अनेक कुटुंबांची आर्थिक आणि मानसिक स्थिती पूर्ण ढासळली आहे. व्यापारी तर तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आहेत. कर्जाचे हफ्ते गोळा करायला येणारे एजंट डायरेक्ट घरी येऊन धमक्या देत आहेत आणि उर्मटपणे काय करायचे ते करा असेही सांगत आहेत. जिथे घरात खायला नाही तिथे हे लोक हफ्ते अगोदर भरा सांगत आहेत. हॉस्पिटल मध्ये गेल्यास घरातील सगळ विकून बिल भरावे लागत आहे. पोलिस विनाकारण रुग्णाला आणि त्याच्यासाठी पळापळ करणाऱ्या नातेवाईकांना त्रास देत आहेत. आता केसेस कमी झाल्यावर वाटलं होत की आता हे सर्व बंद होईल पण परत एकदा पूर्ण lockdown करून सरकारने जनतेच्या गळ्यावर पाय दिला आहे. हे lockdown थांबवून जनतेसाठी आर्थिक आणि मेडिकल मदत लवकरात लवकर जाहीर करावी. यासाठी काही ठळक मागण्या आम्ही करत आहोत
- लॉकडावून करण्याऐवजी पुण्याप्रमाणे 1 दिवसाआड दुकाने ठराविक वेळेत उघडायची परवानगी द्यावी, तसेच दुकानदारावर गर्दी होणार नाही याची पूर्ण जबाबदारी टाकावी. पण कोणतेही दुकानं आता पूर्ण बंद करू नये.
- आर्थिक परिस्थितीने गरीब असणाऱ्या रुग्णांना मोफत उपचार कोणत्याही हॉस्पिटल मध्ये दिले जावेत किमान कोरोनासाठीतरी.
- भाजीपाला विकणाऱ्या लोकांना घराजवळ जाऊन भाजी विकण्याची परवानगी द्यावी तसेच उगाचच कारवाई करून त्रास देऊ नये
- बँक आणि बजाज फायनान्स किंवा श्रीराम फायनान्स सारख्या सक्तीने कर्जवसुली करणाऱ्या लोकांवर गुन्हे नोंद करावेत, आणि त्यांना किमान 3 महिने तरी हफ्ते गोळा करू नये यासाठी मोरेटरियम (Moratorium) देण्यास सांगावे.
- 3 महिन्यांचे वीज बिल माफ करावे.
- ज्या लोकांचे व्यवहार 2 महिने बंद आहेत असे नागरिक व्यापारी, बुडालेले धंदे यांना आर्थिक मदत जाहीर करावी.
- मी सुद्धा या सगळयात खूप खचून गेलो आहे. नोकरी सोडावी लागली आहे तसेच घरचा बिझनेस बंद आहे त्यामुळे हे थांबण्यासाठी आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे, जर आपण शांत बसलो तर हे जे सगळ्यांच्या विचार न करता बंद केलेले आहे त्यामुळे उद्या आपल्या सर्वांच्या घरावर नांगर फिरतील. कित्येक लोक नैराश्याने आत्महत्या करतील. लोक कर्जबाजारी होतील. कित्येक कुटुंबे कायमची उध्वस्त होतील. तरी मी आपणा सर्वांना या साठी. विनंती करत आहे की सर्वांनी या निवेदनाला पाठिंबा द्यावा
दिनेश साठे.

The Decision Makers

Petition Updates
Share this petition
Petition created on 25 May 2021