Neuigkeit zur PetitionAmend Maharastra Apartment Ownership Act,1970 - Save Flat Ownersअखिल भारतीय ग्राहक पंचायती चे प्रयत्न काही प्रमाणात सफल झाले
Flat Buyers in Maharashtra Charter of DemandsPune, Indien
18 Mar 2020

अखिल भारतीय ग्राहक पंचायती चे प्रयत्न काही प्रमाणात सफल झाले व आता अपार्टमेंट धारक लोक सहकार खात्याकडे दाद मागू शकतात असे सरकारने जाहीर केले आहे.

अखिल भारतीय ग्राहक पंचायत
ने दि. २९ सप्टेंबर २०१८ अपार्टमेंट कायद्या १९७० यात बदलाबाबत परिसंवाद आयोजीत केला होता. सदर परीसंवादामधे अँड. प्रमोद बेंदरे, अँड. लीना काैलगेकर, अँड. जयंत कुलकर्णी यांनी अपार्टमेंट अँक्ट बाबत ग्राहकांना मार्गदर्शन केले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे कार्यकर्ते यांनी
सदर परिसंवादामधे अपार्टमेंट कायद्याचा गैरवापर करुन बिल्डर लोक ग्राहकांना कसे फसवत आहेत याबाबत अवगत केले होते
सदर अपार्टमेंट कायदा हा १९७० मधे लहान लहान प्लाँटवर ४-५ गाळे बांधणेसाठी आला होता पण बिल्डर लोक मात्र सदर कायद्याचा गैर वापर करुन आपल्या जवळच्या ५ ग्राहकांचे अपार्टमेंट डीड करुन ईतर ग्राहकांना वार्यावर सोडुन देत आहेत व त्यामुळे जमीनीची मालकी ही स्वताकडे ठेवणेचा प्रयत्न करत आहेत. डीक्लरेशन डीड मधे तसेच करारनामे करताना वरील टेरेस, मोकळी जागा ईत्यादी ठरावीक ग्राहकांना विकुन व तशी घेषणापत्रामधे बेकायदेशीर तरतुद करुन जास्तीत जास्त पैसे कसे काढता येतील ते पाहीले जात आहे.

पाच अपार्टमेंट करुन सोसायटी स्थापनेस अडथळा आणला जातो.
वास्तवीक ग्राहकांना सोसायटी स्थापन करणेचा मुलभुत अधिकार आहे
याबाबत, अखिल भारतीय ग्राहक पंचायत ने www.abgpindia.com या आपल्या वेबसाईटच्या माध्यमातुन ग्राहकांचे पिटिशन चालु करुन ग्राहकांचे एक शिष्टमंडळ अपार्टमेंट कायद्यात दुरुस्ती करणेसाठी व समस्यांबाबत तत्कालीन राज्य मत्री मा. रवींद्र वायकर, यांना मुंबई येथे जाऊन भेटुन निवेदन दिले तसेच श्री रवींद्र वायकर यांनी सर्व सचिव लोकांची एक मीटिंग घेऊन त्यात अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे प्रतिनिधी यांना बोलावले आणि त्यात अपार्टमेंट ऍक्ट बाबत सुधारणा करणे तसेच अपार्टमेंट धारक लोकांना सिव्हिल कोर्ट मधे न जाता सहकार खात्याकडे दाद मागणे बाबत तरतूद करावी अशी चर्चा झाली.
माननीय मुख्य मंत्री यांना पण निवेदन दिले आणि आता त्या प्रयत्नास यश येऊन सरकार ने अपार्टमेंट कायद्यात सुधारणा केली आहे आणि अपार्टमेंट धारक लोकांना थोडा दिलासा दिला आहे.

याबाबत अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे श्री विलास केले, श्री रवींद्र सिन्हा, श्री अरुण नायर, श्री विश्वास चव्हाण, पिंपरी चिंचवड चे हौसिंग फेडरेशन चे श्री सुधीर देशमुख, पुणे जिल्हा हाउसिंग फेडरेशन चे श्री सुहास पटवर्धन तसेच मुंबईमधील श्री राजू नटराजन, डिअर सोसायटीचे श्री युवराज पवार इत्यादी सर्वांनी एक दिलाने काम केले. महाराष्ट्र शासन तसेच श्री रवींद्र वायकर यांचे आभार.

विजय सागर
अध्यक्ष,
अखिल भारतीय ग्राहक पंचायत,
६३४, सदाशिव पेठ, पुणे ३०.

Jetzt unterstützen
Petition unterschreiben
Link kopieren
WhatsApp
Facebook
Nextdoor
E-Mail
X