Aggiornamento sulla petizioneTreat 100% Sewage of Pune city on war-footing to avoid public health emergency

मत मागायला येणाऱ्या उमेदवारांना हे विचाराल ?

Manish GhorpadePune, India
11 apr 2019

नदीसुधारणा प्रकल्प - जो तीन वर्षांपूर्वीच मंजूर झाला होता त्याची आजही हि हालत का आहे? आजही प्रकल्प अधिकारी 'थोड्याच' दिवसात काम चालू होईल असे का म्हणत आहेत?तुमच्या पक्षाची याबाबत काय भूमिका आहे? पर्यावरणाच्या तसेच नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित अशा या महत्वाच्या प्रकल्पाबद्द्ल यापुढे तरी चालढकल होणार नाही यासाठी तुम्ही नक्की काय करणार? हा प्रकल्प पूर्ण होण्याची तारीख काय?

आजवर हे प्रश्न आपण विचारले नाहीत म्हणूनच हि गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. कर्तव्यात कसूर फक्त राजकारण्यांनी आणि सरकारी अधिकाऱ्यांनीच केली नाही. आपणही नागरिक म्हणून कर्तव्यात चुकलो आहोत. योग्य गोष्टी जर होत नसतील तर त्याबद्दल प्रश्न विचारणे, शासन/प्रशासनावर सकारात्मक दबाव टाकणे हे आपलं कर्तव्य नाही का?

आजवर चुकलो असलो तरी आता जागे होऊया. सर्व उमेदवारांना एकच प्रश्न ठिकठिकाणी ऐकू यायला पाहिजे - जायका प्रकल्प पूर्ण कधी होणार?

 

Copia il link
WhatsApp
Facebook
X
E-mail