
*�"एस.टि.महामंडळाचा डोलारा फक्त प्रवाश्यांनी प्रवास केलेल्या,प्रवाशी भाड्यातून चालते"�*
महाराष्ट्र शासनाची अवैध प्रवाशी वाहतुकीकडे डोळेझाक.�
➖➖➖➖➖➖➖➖➖
महाराष्ट्र जनतेचे आणि महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या सुरक्षित प्रवाशी वाहतुक म्हणजे महाराष्ट्राची जीवनवाहीनी,रक्तवाहीनी म्हणून ओळखली जाणारी लालपरी अर्थात एस.टि.आहे.
*"ना नफा ना तोटा"*
या तत्वावर आणि
*बहुजन हिताय,बहुजन सुखाय*
हे ब्रिद वाक्य घेऊन,अबालवृद्ध,विद्यार्थी,महाराष्ट्रातील प्रवाश्यांना सुरक्षितपणे,सुखरूप इच्छित स्थळी पोहंचविण्याचे कार्य करणारे एस.टि.महामंडळ.
आजमितीस शेवटची घटका मोजत आहे.
*महाराष्ट्र शासनाचा उपक्रम*�
असलेली एस.टि.मात्र सरकारच्या अनास्थेची कित्येक वर्षापासून शिकार ठरत चालली आहे.
महाराष्ट्र शासनाकडून,एस.टि.जगवली टिकवली आणि वाढविली पाहिजे याला सर्रास हरताळ फासुन,बेरोजगारांच्या रोजगारासाठी अवैध वाहतुकीला चालना दिली जात आहे.
दहा वर्षापुर्वी १८०००एस.टि.ची संख्या असणाऱ्या महामंडळात आजही १८००० पेक्षा कमीच एस.टी.ची संख्या या पुरोगामी,महाराष्ट्रात दिसून येते.
सरकार मध्ये कोणत्याही पक्षाचे सरकार येवो,एस.टि.मात्र सदैव दुर्लक्षितच.
या महाराष्ट्रातील एकही नागरीक नसेल,ज्यांना आपल्या उभ्या आयुष्यात एकवेळा तरी एस.टि.ने प्रवास करण्याचा योग घडला नसेल.
*स्वायत्त महामंडळ*
या गोंडस नावा खाली,एस.टि.ही तिच्या मिळणाऱ्या उत्पादनात आपला आर्थिक डोलारा ओढत आहे.
*महाराष्ट्रातील जनता जेव्हा प्रवासासाठी,एस.टि.ने जाते,तेव्हा त्यांनी प्रवास केलेल्या,प्रवाशी भाड्याच्याच रूपाने एस.टि.कडे आर्थिक मिळकत मिळत असते*
त्याच मिळकतीतुन,डिझेल,टायर,सुट्टे भाग आणि कामगारांचे पगार.
तसेच
महाराष्ट्र सरकारला,टॕक्सच्या रूपाने,टोल टॕक्स,तसेच ईतर कर पण याच प्रवाशी भाड्याच्या रूपाने मिळणाऱ्या मिळकतीतूनच होत असते.
थोडक्यात
*महाराष्ट्रातील जनतेने एस.टि.तुन केला प्रवास..तरच एस.टि.महामंडळाला मिळेल आर्थिक उत्पन्नाचा मार्ग खास*
पण महाराष्ट्रातील फक्त सत्तर लाख जनताच रोज एस.टि.ने प्रवास करते आणि उर्वरीत जनता,खाजगी वाहतुक अथवा अवैध वाहतुकीने प्रवास करते.
याचाच अर्थ जनतेच्याच एस.टी.ने केलेल्या प्रवासावरच एस.टि.महामंडळाचे आस्तित्व अवलंबून आहे.
म्हणजे
*एस.टि.ही सरकारी नाही*
हे वेगळे सांगायला नको.
म्हणून
*"महाराष्ट्रातील जनतेला कळकळीची विनंती,एस.टि.वर दगड उचलण्यापुर्वी आणि जाळपोळ करण्यापुर्वी फक्त एकदाच विचार करा...हि एस.टि.आपलीच आहे..आपल्या प्रवाशी वाहतुकीचे हेच सुरक्षित आणि सुखकर वाहतुक असून..आपण यातुन प्रवास केलेल्या,प्रवाशी भाड्यातून एस.टि.महामंडळ चालते..तिचे नुकसान म्हणजे आपलेच नुकसान"*
*��एस.टि.चा प्रवास सुखकर प्रवास��*
*��जमल्यास आपणाकडील गृपवर शेअर करा.कळू द्या एस.टि.सरकारी नाही,ती फक्त राजकीय लाभासाठी वापरली जाते*��