

इचलकरंजी (वस्त्रनगरी) ला रेल्वे जोडण्याची मागणी गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. आम्ही ३ लाखांहून अधिक लोकांच्या हातमागाच्या घामाला, तरुणांच्या स्वप्नांना आणि शहराच्या प्रगतीला रेल्वेने जोडण्यासाठी लढत आहोत.
महत्त्वाचे मुद्दे:
- इचलकरंजीचा वार्षिक टेक्सटाइल टर्नओव्हर ₹१५,००० ते २०,००० कोटी रुपये आहे.
- दररोज कोट्यवधी मीटर कापड, यार्न आणि गारमेंट्स रोडने सूरत, अहमदाबाद, मुंबई येथे नेले जाते.
- केवळ ८ किमीच्या हातकणंगले-इचलकरंजी नवीन रेल्वे लाईनसाठी आर.ओ.आर. नकारात्मक दाखवला जात आहे, जे अन्यायकारक आहे.
आमची मागणी:
रेल्वे बोर्ड, @AshwiniVaishnaw जी, @RailMinIndia आणि @gm_crly यांनी तातडीने या प्रकल्पाला मंजुरी द्यावी आणि काम सुरू करावे.
🛤️ इचलकरंजीला रेल्वे हवीच!
सर्वांनी प्रयत्न करावे🙏
आम्ही एक mailto लिंक तयार केली आहे. या लिंकवर क्लिक केल्यास तुमचा ईमेल आपोआप तयार होईल. फक्त “Send” बटण दाबा. एका क्लिकमध्ये तुमचा आवाज उच्च अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचेल!
📧 इचलकरंजी रेल्वेसाठी ईमेल पाठवा - इथे क्लिक करा
https://tinyurl.com/iCH-Railway
https://tinyurl.com/iCH-Railway
कृपया सर्वांना पाठवा ही लिंक नक्की शेअर करा. जितके जास्त ईमेल जातील तितका दबाव वाढेल!
#IchalkaranjiRailway
#इचलकरंजी_रेल्वे_हवी
जय हिंद! जय महाराष्ट्र! 🚂🙏