Petition updateAppeal to make Nigdi as starting point for Pune Metro phase 1

What we PCMCkar acheived so far

Amol DeshpandePimpri-Chinchwad, India
Jul 15, 2017
- Metro will first run within Pimpri Chinchwad city limit - Mr Brijesh Dixit reiterated that detail project report DPR for Pimpri-Nigdi stretch will be prepared soon. Then they will send DPR to State & Center for further sanction - Talks begin with PCMC planner on design of Metro route over Chinchwad Empire Estate flyover and construction of the flyover and grade separator at Bhakti Shakti Chowk in Nigdi. Team's integrated approach for Nigdi is an important step which will give boost to 'Multi Modal Transport Hub' demand PCCF raised 4 years back - Our #PimpriChinchwadFirst approach is also well taken, Mahametro will soon start a full-fledged office at Phugewadi & A public information centre will also come up at the Sant Tukamnagar ST depot for people to see the actual progress on ground and share their suggestions and complaints about the difficulties they face with the metro construction आत्तापर्यंत आपल्याला काय साध्य झाले? - मेट्रो सर्वात प्रथम पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीत धावेल - महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. ब्रिजेश दीक्षित यांनी दुजोरा दिला कि पिंपरी-निगडी मेट्रो विस्ताराचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येईल व त्यांनतर अहवाल मंजुरीसाठी राज्य व केंद्राला पाठवले जाईल - एम्पायर इस्टेट, चिंचवड येथील उड्डाणपूल व भक्ती-शक्ती निगडी, येथे आधीच मंजूर झालेल्या उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटरभोवती मेट्रोच्या रचनेवर पिंपरी चिंचवड महापालिका अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरु झालीआहे. निगडी येथे एकात्मिक रचना हा मेट्रोचा दृष्टिकोन हि स्वागतार्ह बाब आहे, पीसीसीएफ टीमने ४ वर्षांपूर्वी मांडलेली 'मल्टीमोडलं ट्रान्सपोर्ट हब' हि मागणी त्यामुळे प्रत्यक्षात उतरेल - पीसीसीएफने #पिंपरीचिंचवडफर्स्ट नावाने केलेली जनजागृती प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. महामेट्रोचे अद्ययावत कार्यालय फुगेवाडी येथे सुरु होईल तर दुसरीकडे वल्लभनगर येथील संत तुकाराम एसटी डेपोच्या आवारात सार्वजनिक माहिती केंद्र सुरु होणार आहे. या केंद्राद्वारे लोकांना मेट्रो प्रकल्पाची प्रगती अभ्यासता येणार आहे तसेच सूचना व समस्या मांडता येणार आहे
Copy link
WhatsApp
Facebook
Nextdoor
Email
X