Aggiornamento sulla petizioneEnlist Forts of Maharashtra as UNESCO World Heritage Sitesकेंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणात तफावत
Aanand KhardeMumbai, India
7 apr 2015
दैनिक लोकमत ७-४-२०१५ युतीच्या राज्यातही किल्ले दुर्लक्षित! सरकारची दिरंगाई : युनेस्कोच्या संरक्षित स्मारकांच्या यादीत रायगडचा समावेश नाही गड-किल्ल्यांप्रती अनास्था मुंबई : शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणार्‍या शिवसेना-भाजपा प्रणीत युती सरकारच्या राज्यातही किल्ल्यांची अवस्था फारशी काही समाधानकारक राहिली नसल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. महाराष्ट्रातील गड, किल्ले युनेस्कोच्या संरक्षित स्मारक यादीत समाविष्ट करण्याबाबत राज्याने केंद्राकडे कोणताच प्रस्ताव दाखल केला नसल्याचे माहिती अधिकारान्वये प्राप्त झालेल्या कागदपत्रांतून समोर आले आहे. इतिहास संशोधक आनंद खर्डे यांनी राज्याच्या पुरातत्त्व विभागाकडे महाराष्ट्रातील कोणते किल्ले युनेस्कोच्या संरक्षित स्मारक यादीत समाविष्ट करण्याबाबत काही विचार झाला आहे का? शिवाय अशा आशयाचा प्रस्तावही केंद्राकडे पाठविण्यात आला आहे का? याबाबतची माहिती विचारली होती. आनंद खर्डे यांनी माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नांवर राज्य सरकारकडून सह्याद्री पर्वत रांगेतील रायगड किल्ला हा जागतिक दर्जाचे स्मारक (वर्ल्ड हेरिटेज) म्हणून घोषित करण्यासाठी पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाकडून दिल्ली येथील केंद्रीय सांस्कृतिक कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आल्याचे उत्तर देण्यात आले. शिवाय यासंदर्भातील अधिक माहितीसाठी सांस्कृतिक मंत्री चंद्रेश कुमारी कटोच यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात यावा, असेही राज्याने सुचविले. युनेस्को संरक्षित स्मारक घोषित करण्याबाबतच्या कोणत्याही तज्ज्ञ समितीबाबतची माहिती संचालनालयाकडे उपलब्ध नाही. पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय यांच्या अखत्यारीत तोरणा, राजगड, सिंहगड, कोयरीगड, विशालगड, रांगणा, भुदरगड असे एकूण सात किल्ले राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झाल्याची माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी) : केंद्राने युनेस्कोच्या यादीत रायगडाचा समावेश करण्याबाबतची योजना नसल्याचे नमूद केले. राज्याने पत्रव्यवहार केला तर केंद्राने याबाबत सकारात्मक उत्तर का दिले नाही, असा प्रश्न विचारला जात आहे
Copia il link
WhatsApp
Facebook
X
E-mail