#support Dr.Yogesh Mhase ,commissioner,Bhiwandi Nizampur Mahanagarpalika,Thane,Maharashtra

0 व्यक्ति ने हसताकषर गये। 100 हसताकषर जुटाएं!


भिवंडी : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या अठरा नगरसेवकांच्या विरोधातील चौकशी तसेच महापालिका कार्यक्षेत्रात प्रभावीपणे करवसुली,अनाधिकृत तोडू बांधकाम मोहिम, मेट्रो रेल्वे प्रकल्प व स्वच्छ भारत अभियान मोहिम राबविणारे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांची शासनाने बदली करावी यासाठी राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी मंत्रालयात धाव घेऊन मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे. शहरातील सर्वसामान्य नागरिक व काही व्यापारी राजकीय पक्षांच्या या कृत्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.

मागील वर्षी डॉ. योगेश म्हसे यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतली. त्यावेळी पालिकेच्या तिजोरीत केवळ 18 लाख रूपये जमा होते. त्यामुळे पालिकेच्या कामगारांचे पगार थकले होते. पालिकेची आर्थिक परिस्थीती बिकट असताना आयुक्तांनी कर वसुलीचा आढावा घेतला असता त्यांना शहरातील मोठया व्यावसायीकांनी व रहिवासी नागरिकांनी मोठया संख्येने मालमत्ता कर थकविला असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी पालिकेचा कर थकविणारे रहिवासी व स्थानिक स्वराज्य संस्थाकर थकविणारे व्यापारी यांच्याकडून करवसुली करण्याचे कडक आदेश दिले. त्यामुळे पालिकेतील बहुसंख्य नगरसेवक व राजकीय पक्षांचे पुढारी दुखावले गेले.

करवसुलीबाबत अनेकांनी हस्तक्षेप केला. मात्र राजकीय दबावास बळी न पडता आयुक्त योगेश म्हसे यांनी सुमारे 5 कोटीची करवसुली करून पालिकेची दोलायमान झालेली आर्थिकस्थिती बळकट करण्याचा प्रयत्न केला. त्याच बरोबर पालिकेतील कामचुकार व गैरहजर कर्मचाऱ्यांवर बदलीचा व निलंबनाचा बडगा उगारल्याने पालिकेतील टॉपटेन नगरसेवकांचे नातेवाईक व हस्तक भरडले गेले. मेट्रोरेल्वे व शहराच्या विकास आराखडयानुसार आयुक्तांनी रस्तारूंदीकरण मोहिम सुरू केली. त्यामुळे काही राजकीय पुढारी दुखावले गेले. त्यांनी हा राग मनात ठेऊन अनेकांनी आपापल्या पक्षाच्या पुढाऱ्यांकडून आयुक्तांच्या बदलीची मोहीम सुरू केली. याच दरम्यान पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या काही नगरसेवकांनी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रनुसार विहित वेळेत कागदपत्रे सादर केलेली नाही. त्यांची कागदपत्रे आयोगाने आयुक्तांमार्फत मागविली आहे.

नगरसेवकांविरूध्द आलेल्या तक्रारीनुसार जात प्रमाणपत्र,अनाधिकृत बांधकामांना संरक्षण देणो, तीन आपत्य लपविणो, गुन्हेगारी पाश्वभूमी लपविणो अशा विविध तक्रारी बाबत 18 नगरसेवकांची चौकशी आयुक्त म्हसे यांनी सुरू केली आहे. त्यामुळे आपली नगरसेवकपदे सुरक्षीत रहावी यासाठी काही नगरसेवकांनी राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांशी संधान करून थेट मुख्यमंत्र्यांकडे आयुक्त म्हसे यांच्या विरोधात थेट तक्रारी सुरू करून त्यांची भिवंडी महानगरपालिकेतून बदलीची धडपड सुरू केली आहे.

"शासनाने मला पारदर्शक काम करून भिवंडीचा विकास करण्यासाठी पाठविले आहे. त्यामुळे मी नियमानुसार काम करीत आहे. सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन शहराचा विकास होत आहे. कोणी माझ्या बदलीसाठी प्रयत्न करीत असेल तर मला माहीत नाही"
- डॉ. योगेश म्हसे, आयुक्त,
भिवंडी महापालिका