भोर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभा व महत्त्वाच्या बैठकींचे थेट प्रक्षेपण सुरू करा
The Issue
भोर आपलं गाव आहे... आणि ते घडवण्याची जबाबदारीही आपलीच..
भोरशी आपलं नातं जन्माचं असो किंवा कर्माचं, आपली ओळख या भूमीशी जोडलेली आहे. म्हणूनच अधिक पारदर्शक, उत्तरदायी आणि लोकाभिमुख प्रशासन, वाढता नागरिक सहभाग आणि विधायक संवाद या सकारात्मक हेतूने हा डिजिटल उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
भोर नगरपालिकेची स्थापना इ.स. १८८५ मध्ये झाली. शतकाहून अधिक काळाची परंपरा लाभलेल्या या संस्थेने काळानुसार अनेक बदल पाहिले आहेत. आज डिजिटल युगात नागरिकांना प्रशासनाशी अधिक प्रभावीपणे जोडण्यासाठी आणि लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक माध्यमांचा स्वीकार होणे आवश्यक आहे.
लोकशाहीमध्ये पारदर्शकता, लोकसहभाग आणि संवाद असेल, तरच ती खरी लोकशाही ठरते.
याच भावनेतून या डिजिटल याचिकेद्वारे भोर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभा व महत्त्वाच्या बैठकींचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांना निर्णयप्रक्रिया प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळेल, प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होईल आणि नागरिकांचा सहभागही वाढेल.
या उपक्रमामागे कोणताही राजकीय हेतू नाही, तसेच कोणत्याही व्यक्ती, पक्ष किंवा प्रशासनावर टीका करण्याचाही उद्देश नाही. हा उपक्रम केवळ नागरिक आणि प्रशासन यांच्यात विश्वास, संवाद, पारदर्शकता आणि विधायक सहभाग वाढवण्यासाठी आहे.
ही डिजिटल याचिका केवळ एका मागणीची सुरुवात नाही. भोरच्या लोकहिताशी संबंधित विविध विषयांवर नागरिकांना एकत्र आणणे, विधायक सूचना मांडणे आणि सामूहिक सहभागातून सकारात्मक बदल घडवणे, हा या उपक्रमाचा व्यापक उद्देश आहे.
भोर आपलं गाव आहे... आणि ते घडवण्याची जबाबदारीही आपलीच आहे.
लोकांकडून • लोकांनी • लोकहितासाठी

88

Petition Updates
Share this petition
Petition created on 30 June 2026