पवई तलावाला गटार होण्यापासून रोखणे

पवई तलावाला गटार होण्यापासून रोखणे
The Issue
करोडो रुपये खर्च करून सौंदर्यीकरण करण्यात आलेल्या पवई तलावातील पाण्यात आसपासच्या परिसरातून गटाराचे पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे तलावातील पाणी दुषित होवून, तलावात घाणीचे साम्राज्य पसरून, तलावाचे रूपांतर हळूहळू गटारात होत आहे. संपूर्ण पवई तलावाच्या परिसरातून जाताना लोकांना येथून येणाऱ्या दुर्गंधीमुळे नाकावर रूमाल ठेवून प्रवास करावा लागत आहे.
मुंबईकर राजेश पिल्लाई यांनी पालिकेला फोन तक्रार क्रमांक ०७२२०१४७२० व लेखी तक्रार क्रमांक ०७२२०१००३९ (दिनांक १३ मार्च २०१६) नुसार तक्रार नोंदवल्या आहेत. तर ‘पॉज मुंबई’ संस्थेतर्फे ‘मिशन सेव्ह पवई लेक’ अंतर्गत राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय, पालिका सहाय्यक आयुक्त ‘एस’ विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून तक्रार नोंदवली गेली आहे.
जास्तीत जास्त मुंबईकरांनी एकत्रित येऊन पवई तलाव बचाव मोहिमेत सहभाग नोंदवावा.

Petition Closed
Share this petition
The Decision Makers
Petition Updates
Share this petition
Petition created on 15 May 2016