

नांदणी संस्थान मठातील माधुरी हत्ती परत मिळवा
The Issue
अंबानी, काय मिळवलंय तुम्ही?
खूप श्रीमंत आहात,तुम्ही
हवं ते मिळवता,
माणसं काय, कायदा काय,
प्राणी सुद्धा पळवता
कशासाठी? कुणासाठी
इतकी धडपड सांगा तरी,
द्याना सोडून हट्ट पोराचा
हत्ती पाठवा आमच्या घरी ...
अस्तित्वाची खाण होता,
गावची आमच्या शाण होता,
भगवंताच्या पूजेला
त्याचाच तर मान होता.
तुमच्या लेखी फारसं काही
झालं नाही जरी,
द्याना सोडून हट्ट पोराचा
हत्ती पाठवा आमच्या घरी
अहिंसेचे पूजक आहोत,
नखं लागू दिलं नसतं,
हत्ती काय, फुलपाखरालाही
सुंदर घरटं बांधलं असतं.
हीच शिकवण आहे आम्हा
भगवान महावीरांची खरी,
द्याना सोडून हट्ट पोराचा
हत्ती पाठवा आमच्या घरी...
येऊन बघा एकदा इथं,
गाव सारा सुन्न कसं
हरवून गेलंय आमचं आभाळ,
काळीज झालंय धस्सं
तुमच्या इतकी श्रीमंती नसेल,
परिस्थिती आमची आहे बरी,
द्याना सोडून हट्ट पोराचा
हत्ती पाठवा आमच्या घरी...
2
The Issue
अंबानी, काय मिळवलंय तुम्ही?
खूप श्रीमंत आहात,तुम्ही
हवं ते मिळवता,
माणसं काय, कायदा काय,
प्राणी सुद्धा पळवता
कशासाठी? कुणासाठी
इतकी धडपड सांगा तरी,
द्याना सोडून हट्ट पोराचा
हत्ती पाठवा आमच्या घरी ...
अस्तित्वाची खाण होता,
गावची आमच्या शाण होता,
भगवंताच्या पूजेला
त्याचाच तर मान होता.
तुमच्या लेखी फारसं काही
झालं नाही जरी,
द्याना सोडून हट्ट पोराचा
हत्ती पाठवा आमच्या घरी
अहिंसेचे पूजक आहोत,
नखं लागू दिलं नसतं,
हत्ती काय, फुलपाखरालाही
सुंदर घरटं बांधलं असतं.
हीच शिकवण आहे आम्हा
भगवान महावीरांची खरी,
द्याना सोडून हट्ट पोराचा
हत्ती पाठवा आमच्या घरी...
येऊन बघा एकदा इथं,
गाव सारा सुन्न कसं
हरवून गेलंय आमचं आभाळ,
काळीज झालंय धस्सं
तुमच्या इतकी श्रीमंती नसेल,
परिस्थिती आमची आहे बरी,
द्याना सोडून हट्ट पोराचा
हत्ती पाठवा आमच्या घरी...
Petition Updates
Share this petition
Petition created on 31 July 2025