
नदीमित्रहो-
मुकुंदराव, कोविड चा धोका ओसरला कि आपण मुठा नदी वरती जाऊ, आणि DO चाचण्या घेऊयात. या नदीच्या पाण्यातील विरघळलेल्या प्राणवायूच्या चाचण्या त्या पाण्यातील विरघळलेल्या प्राणवायूची मात्रा ८ दशलक्षांश (८ ppm) आहे कि नाही हे सांगतात.
.
(Dissolved Oxygen) DO जेव्हां ४ ppm च्या खाली जाते तेव्हां मासे मरतात. परदेशांतून आणलेले चिलापी आणि मांगूर सारखे मासे मात्र १ ते २ ppm DO च्या पाण्यामध्ये पण जगतात. ते अपवाद आहेत. आपण जेवढा जैविक आणि रासायनिक कचरा नदीत टाकतो तेवढे पाण्यातल्या विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण घटते - आणि प्राणवायू रहित नदी ही नदीचं राहत नाही कारण ज्या पाण्यात मासे जगत नाहीत ती नदी कशी म्हणावी?
.
डाऊनस्ट्रीम राहण्याऱ्या जनतेसाठी ४ ppm खाली गेलेले नदी-पाण्यातील DO हा फार मोठा धोक्याचा इशारा समजला जातो. आज विठ्ठलवाडी मंदिर ते मुळा-मुठा संगम पर्यंत ० ते २ ppm DO असे मुठा-पाण्याचे रिडींग येते. पावसाळ्यात अर्थात हे रीडिंग वरती जाते व पाऊस ओसरल्यानंतर परत ०-२ च्या दिशेने घसरते.
.
माझ्याकडे टेस्टिंग किट असते. मग तुमच्या आणि जीवितनदी, वनराई, सजग नागरिक मंच, जलबिरादरी, महा एनजीओ फेडेरेशन, वसुंधरा स्वच्छता अभियान, रामनादि रेस्टोरेशन मिशन, जलदिंडी प्रतिष्ठान, सागरमित्र अभियान आणि इतर अनेक दीर्घानुभवी संस्थांच्या स्वयंसेवी युवक नेटवर्क च्या मदतीने, आपण, मोजक्या आणि उत्साही युवकांचे साधे २ तासांचे ट्रेनिंग घेऊन व त्यांना DO टेस्टिंग किट्स देऊन, ठरलेल्या १० पॉईंट्स वर DO दर आठवड्याला घेऊयात. नदीकाठी २ तासांचे शिबीर घेण्यापूर्वी ऑनलाईन ट्रेनिंग ही घेता येईल.
.
पुढे, वर्षातल्या १० पॉईंट्सच्या वरील ५२ आठवड्यांच्या वार्षिक चाचण्या खूप महत्वाच्या होतील - कारण जिथे जिथे ओढे आपल्या मुठा नदीला प्रदूषित करतात तिथे आपण या चाचण्या घेण्याची.सिस्टिम बसवू. यामुळे Dissolved Oxygen चा विषय सामान्य लोकांपुढेही सातत्याने मांडला जाईल आणि मीडिया पर्यंत पोहोचेल.
.
पुढे, CSR ची मदत घेऊन अनेक कॉलेज आणि स्वयंसेवी संस्थांना जोडून घेऊन, जसे हे काम वाढेल तेव्हां वर्तमानपत्रांमध्ये अक्ख्या नदी-नाल्यांचे DO रीडिंग दर आठवड्याला छापले जाईल आणि हे नदी-जागृती आणि नदी-रक्षणाचे कार्य-संस्कार घडता घडता नदी-संस्कृतीच्या रूपाने आपल्या पुढच्या पिढीला मिळतीलच. .
.
यात कोणाची (गव्हर्नमेंट किंवा कोणत्याही विशिष्ट संस्थेची) चूक दाखविण्याचा नकारात्मक उद्देश नसून पुणे पिंपरी-चिंचवड च्या शहरी अपस्ट्रीम हून येण्याऱ्या प्रदूषणामुळे खाली डाऊनस्ट्रीम येथे ग्रामीण भागात काय नुकसान होते याचा हा सकारात्मक-समाज-जागृती व रचनात्मक-श्रम-जागृतीचा यत्न असेल. अशा प्रकारचे DO चाचणी कार्य RRM (किर्लोस्कर वसुंधरा 'रामनदी रेस्टोरेशन मिशन') तर्फे सुरु झालेले आहेच.आणि शासनातर्फे ही त्यांच्या पद्धतीने होतंच असते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांच्या सर्व संबंधित डिपार्टमेंट्स ना बरोबर आणि विश्वासात घेऊनच हे कार्य घडेल. यात आपले सर्वांचे PMC पर्यावरण विभागाचे अधिकारी श्री मंगेश दिघे जी आणि आपले सर्वांचे PCMC पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी जी आणि MPCB यांना लोकसहभागाची शास्वती देता येईल. शासनाच्या संकल्पात लोकांचा सहभाग या बरोबर लोकांच्या संकल्पात शासनाचा सहभाग हा, परस्परपूरक आणि परस्परपोषक, वैज्ञानिक, नैतिक आणि व्यावहारिक (scientific, ethical & practical) संवाद घडवून आणता येईल.
.
यातून संपूर्ण पुणे जिल्ह्यातल्या जल-स्रोतांच्या DO अभ्यासाकडे व्याप सहज आणि समग्रतेने सर्वांना एकत्र घेऊन वाढविता येईल. पुणे शहर हद्दीच्या खाली मुठा-भीमानदी यांच्या वाळकी-संगम पर्यंत नदीच्या दोन्ही बाजूंचे शेत आणि प्रजा आणि वाळकी संगमापासून दौंड, इंदापूर, पळसदेव, कुंभारगाव, सिद्धटेक, गंगावळण, कांदलगाव, उजनी धरणाच्या भिंती पर्यंत नदी आणि धरण-पाणीसाठ्याच्या दोन्ही बाजूंचे शेत, पर्यावरण, कोळी-बंधू , जलचर आणि प्रजा यांच्या अनेक दशकांच्या प्रदूषण-ग्रासित आक्रोशाला वाचा मिळेल आणि शहरातील समाजाची जबाबदारी आपोआपच वाढेल.
.
यात जलपुरुष डॉ.राजेंद्रसिंघजी म्हणतात तसे संत-तज्ञ, समाज, शासन, मीडिया आणि महाजन-इंडस्ट्री-CSR या सर्वांना एकत्र घेऊन उप्पर भीमा रिव्हर बेसिन या नदी-पर्यावरण क्षेत्रात प्रदूषण जागृतीतून प्रदूषण मुक्ती कडे एकत्र जोडलेला जल-जागृत आणि श्रम-जागृत अख्खा समाज घडविता येईल.
.
पुणे जिल्हा जनसंख्या २०११ चे आकडे ९४,२९,४०८ आहेत - म्हणजे आज आपली संख्या नक्कीच १ करोड च्या हून अधिक असणार - एवढ्या सर्वांना जल-साक्षरतेतून श्रम-जागृती पर्यंत जोडता येईल. अनेक उत्तम-संस्था हे काम सर्व भीमा खोऱ्यामध्ये करीतच आहेत त्यांना आपण समर्पित होऊन सर्वांबरोबर सर्वसंमतीने काम करू. नदी-जोड पेक्षा ही जल-जन-जोडो ला असाधारण महत्व आहे.
.
पुढे, उजनी धरणानंतर भीमा-नदी च्या दोन्ही काठांवरच्या समाजाला समर्पित होत होत, आपण सर्व पुणेकर, देवाची-उरळी, नीरा-नरसिंगपूर, नावरे-श्रीपूर, इसबाबी आणि पंढरपूर पर्यंत हे काम वाढवून या 'समाज-शुद्धीतून जल-शुद्धी' च्या वारीमध्ये वारकरी बनुयात. यात जलदिंडी चे संस्थापक डॉ.विश्वास येवले आणि त्यांच्या माध्यमातून वारकरी संप्रदाय यांचे अविरत, निर्मळ आणि सकारात्मक स्वास्थ्य-पर्यावरण-अध्यात्माचे मार्गदर्शन मिळेलच. याच बरोबर SERI सारख्या वैज्ञानिक संस्थांचे मार्गदर्शन मिळून SERI-च्याच स्व.डॉ संदीप जोशी यांच्या संकल्पातील उप्पर भीमा खोऱ्याचे सतत वैज्ञानिक सर्वेक्षण होत राहील. डॉ.विद्यानंद रानडेंच्या उप्पर भीमा वॉटर पार्टनरशिप ला ही अनेक युवकांची साथ मिळेल. तसेच श्री रवींद्र धारिया जी, श्री अनील गायकवाड जी, श्री अनील पाटील जी, सुनील जोशी जी आणि नरेंद्र चुघ जी यांच्या सारख्या दीर्घानुभवी संघटकांची शक्ती मिळेल. वीरेंद्र चित्राव जी, सारंग यादवाडकर जी, धनंजय शेडबाळे जी, विजय वरुडकर जी, निरंजन उपासानी जी, शैलेंद्र पटेल जी, शैलजा देशपांडे जी, मनीष घोरपडे जी, वैशाली पाटकर जी, डॉ. गुरुदास नूलकर जी, डॉ. मंगेश कश्यप जी, डॉ. सचिन पुणेकरजी - या आणि अशा अनेक नदीकरांच्या अनुभवापासून शिकता येईल. पुण्याच्या डाऊनस्ट्रीम चे श्री भगवानराव महाडिक जी (भिगवण); उजनी अभ्यासक श्री तानाजी काळे जी (पळसदेव); श्री चंद्रकांत भोई जी (कुंभारगाव); श्री मधुकर गलांडे जी व श्री भारत मल्लव जी (दोघे ज्येष्ठ पत्रकार) या व अशा भीमेकर आणि उजनीकरांचे सर्व च्या सर्व म्हणणे (व्यथा आणि गाथा) आपण पुणेकरांना ऐकावेच लागेल आणि त्याप्रमाणे आपल्या शहरीकरणाला अंकुश घालून डेव्हलपमेंट ची व्याख्याच बदलावी लागेल.
.
उजनी जलाशयातील एके काळी विपुल प्रमाणात जगणाऱ्या वाम, मरळ, कारणासी, कटला, कारणस, काणीस, सिनता, गुगळी या जातीचे मासे परत एकदा जगविण्यासाठी पण हा प्रयत्न आहे. त्यांना काय हवे हे पण आपल्याला बघावे लागणार आहे.
.
त्याही पुढे 'कृष्णा खोरे कुटुंब' या नवं-निर्मित (डॉ.विजय परांजपे, गोमुख, प्रेरित) दीर्घ-संकल्पातील महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश यांतील कृष्णा-नदीकरी यांच्या प्राथमिक सर्वांनुमतीने बनलेल्या 'हैदराबाद डिक्लेरेशन २२ मे २०१८' च्या अनुषंगाने पुढची सरितामैत्री, सागरमैत्री आणि जलचक्रमैत्रीची पाऊले या जल-वारीतून गंगा-सागरापर्यंत पोह्चतीलच.
.
कोवीड सुद्धा जाईल, पण पुण्याचे प्रदूषण मुळा-मुठा नदी मार्गे भीमा-चंद्रभागेला त्रास देतच राहणार आहे.
आपण सर्वच लढा देत आहोत. काय करावे - डाऊन स्ट्रीम च्या रहिवाश्यांना आपला त्रास होतंच आहे ना.
पूर्व प्रयत्नांचे चित्र बघितले कि भविष्याची, कोवीड-नंतरची, कार्य-दिशा आठवत राहील, म्हणून ही विस्तारित पोस्ट.