महामहिम राज्यपाल भगतसिंगजी कोश्यारी यांना सन्मानाने दिल्लीला परत बोलवणे बाबत !

Petition Closed

This petition had 167 supporters

The Issue

महामहिम राज्यपाल भगतसिंगजी कोश्यारी हे गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी विराजमान आहेत ..राज्यातील गेल्या सहा महिन्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचलाय .. या वयात राज्यपाल महोदयांच्या प्रकृतीवर अतिरिक्त ताण येणाऱ्या सर्व घटना आहेत.. अगदी प्रातःविधी आधी शपथविधी , सारखे चहापाण्यास येणारी मंडळी हे सगळे प्रकार राज्यपाल महोदयांच्या आरोग्यास घातक आहेत .. राज्यपाल पदाच्या महानतेला न शोभणारी चिखलफेक मनाला दुःखी करते ..
शिवराम हरी राजगुरूंच्या या राज्यात भगतसिंग नाव धारण केलेल्या व्यक्तीची सत्तालोलुप राजकारणाच्या पोटी इतकी अवहेलना नको हे सगळे तमाम मराठी माणसांना वेदनादायी आहे तेव्हा लवकरात लवकर त्यांना दिल्लीत सन्मानपूर्वक परत बोलवावे ही नम्र विनंती !

avatar of the starter
Amol DeolekarPetition Starter

Petition Updates