
सेंद्रिय शेती आता आपल्याला हाक मारत आहे वेळीच साद आणि साथ द्यायची वेळ आलेली आहे.
” कळते पण वळत नाही “
सद्यपरिस्थितीत या म्हणीचा प्रत्यय खुप वेळा यायला लागलाय. आम्हाला सर्व समजते
परंतू दिवसेंदिवस माहित असूनही शेतकरी बांधव बिडी,तंबाखु गुटका सेवन आणि रासायणिक खतांचा ,अतिविषारी
तणनाशक,जंतूनाशक (पॅकिंगवर लिहिलेल्या धोक्याच्या सर्व सुचनांना गुंडाळून )फवारणींचा राजरोसपणे वाढीव प्रमाणात वापर करत आहोत.
साक्षरतेच्या जागरूकपणामुळे देखील जन्मताच स्वार्थी असलेला मानव शरीराबाबत अतीदक्ष होतांना काहिसा घाबरू लागला आहे हे प्रचलित होतांना दिसत आहे.परंतू घाबरलेल्या या अवस्थेत स्वार्थ आणि मानसिक संतूलनावरचे नियंत्रण (अहम् )यांच्या युध्दात अहम आपणांस अशा फटाफट चमत्कारिक गोष्टिंकडे आकर्षित करत आहे का?
फटाफट फवारणी मुळे जास्त कृषी उत्पन्नाच्या आशेने तसेच जोडधंदा म्हणून पारंपारिक देशी“गोपालन” सोडून या नावाखाली रूजविलेला कृषीउद्योग पशुखाद्य सडवलेली मद्यमय मकाकुट्टी आणि स्टेराईडचे इंजेक्शन चा माराकरून प्रचलित संकरीत (गायीचे नव्हे तर) जनावराचे १५-२० लिटर दुध मिळवून कुटुंबाच्या आर्थिक समीकरणाची सांगड कशीबशी घालत असतांना आपण आपल्याच कुटुंबाचे स्वास्थ किती पणाला लावतोय ?
दिवसभराचे संपूर्ण परिवाराचे श्रमदानाचे मोल लक्षात न घेतां तसेच यामुळे कुटुंबावर होणार्या नकारण ब्लडप्रेशर,डायबिटीज यात भरीला कॅन्सर याचा
औषधोपचाराचा खर्च वजा करता हा ऊद्योग / व्यवसाय शेतकरी कुटुंबाकरता किती आणि कसा फायदेशीर ठरतो? याची शहानीशा प्रत्येक शेतकरी बांधवाने करणे गरजेचे झाले आहे.
एका प्रगतशील शेतकरी कुटुंबातील आपल्या प्रिय वृध्दमातेला गर्भाशयातील भयानक अशा कर्करोगाची शिकार झालेली बघतांना संपूर्ण कुटुंब कसे असहाय्य झालेले दिसत होते.
आजवर चार पु्त्रांचा एकत्र परिवार ज्या मातेने आपल्या मातृत्वाच्या बळावर टिकवला त्याच मातेला झालेली हि भयावह पिडा आणि तीचे होणारे हाल / कुचंबना अजिबात बघवत नव्हती.कुटंबाच्या संपूर्ण आर्थिक उलाघाडीला देखील उपचारावरील अजस्र खर्चाने बरीच खिळ बसून एकत्र कुटुंबाचे संपूर्ण अर्थकारण अस्थिर झालेले दिसत होते.
आणि आज सकाळी मुंबईतील माझ्याच रहात्या बिल्डींगमधील दुसरी एक समवयस्क वृध्द माता देखील गर्भाशयातील कर्करोगाबरोबरच गेली ४ महिने झुंज देत असल्याचे समजले.
दोन्ही केसमधील रोग्याचे साम्य ऐकून मन अगदि विषन्न झाले.
पहिल्या केसमधे कष्टकरी शेतकरीमाता कधी कधी तंबाखु सेवन करत होती परंतू दुसर्या केसमधील मुंबईतील माता निवृत्तआदर्श शिक्षिका असून त्यांना कुठलेही व्यसन किंवा इतर आजार नव्हते . योगायोगाने हा विरोधाभास असला तरी कॅन्सरचे तज्ञ शल्यचिकिस्तक आणि विशारदांच्या मते कर्करोगाच्या एकंदरीत रूग्णांत ८०% वाटा तंबाखुचे सेवन करणार्या रूग्णांमधे प्रामुख्याने आढळून येत आहेत असे ठासून सांगतात याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही.
आणि दुसर्या केसमधे रासायणिकशेती उत्पादने ,विषारी औषधे, संकरीत दुध, कार्बाईडने पिकवलेले फळं,प्रतीजैविके इ.च्या अतीसेवनामुळे शरीरातील चलपेशींचे निश्चल पेशीमधे रूपांतर होऊन शरीरातील चल आणि निश्चल पेशींचे प्रमाणाचे संतुलन बिघडून अकार्यक्षम पेशींचे प्रमाण वाढते व शरिरात कर्करोग बळावतो . ज्यांची प्रतिकार क्षमता कमी आहे ती व्यक्ती याला लगेच बळी पडते.
दोन्ही बाबतीत शेतकर्यांच्या जीवनशैलीचा जास्त संबंध आढळून येतो.
अपवादानेच एखाद्याची तंबाखू खाऊनही प्रतिकार क्षमता चांगली असली तरी आणि त्याला कदाचित कर्करोग झाला नसेलही परंतू तरी त्याने तसा अभिमान बाळगण्यात काहीच तथ्य नाही अथवा तसा चुकिचा
निष्कर्श काढून निर्धास्तपणाने व्यसनाधीन होणे किंवा त्या व्यसनांचे समर्थन करणे चुकिचे आहे.
समाजातील असेच काही महाभाग “केवळ तंबाखुनेच कर्करोग होतो असे काही नाही”असे छातीठोकपणे समर्थन करतांनाही भेटतात. अमूक अमूक व्यक्तीला काहीही व्यसन नसतांना कॅन्सर झाल्याचे उदाहरण देत इतरांनाही तसा दुश्वास दाखवतात.त्यांनी या भयानक वस्तूस्थितीचे वास्तव समजावून घेणे खुप गरजेचे आहे.त्यांची अशी भोळीभाबडी गैरसमजूत दूर करून घेत स्व:तची आणि इतरांचीही फसवणुक आता थांबवावी.
जवळच्या कर्करोग हॅास्पिटलला भेट देऊन
तेथील पिडीत बालरूग्ण बघावेत. आपल्या भावी पीढिला आपल्याकडून नकळत किती अकार्यक्षम शुक्राणुची भर घालून पुढच्या येणार्या पीढिला मागिल पिढींनी सेवन केलेल्या तंबाखूचे दुष्परिणाम दाखवणारे असे किती भयानक भोग भोगावयास लागतात हे त्या पिडीत बालरूग्णांची केमोथेरपी (विषप्राशन कॅन्सर रूग्ण /मनुष्य पांढरा फटपटीत पडतो )केल्यानंतरची ती दयनीय हालाकिची आणि भयावह अशी परिस्थिती प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी बघितल्यावर मन हेलावनार्या वेदना मनाला खुप असह्य होतात.किंवा आपला पुढिल वंश असा काही असहाय्य व्याधींचा शिकार होईल याची किंचितही दखल घेतली तरी या व्यक्ती तंबाखु गुटका त्वरीत वर्ज करतील.
पिडीत कुटुंबाची होणारी केविलवाणी वाताहत ,रूग्णाची होणारी अकारण अवहेलना अजिबात बघवत नाही .
आपल्या व्यसनाचा प्रत्यक्ष आपल्या कुटुंबावर आणि पर्यायाने भावी वंशावर काय परिणाम होतो? हे समजून घेणे महत्वाचे असून आता ही धोक्याची घंटा वाजत आहे.
मी स्व:त माझ्या निकडीचे ३ नातेवाईक कर्करोगरूग्णांची आणि कुटुंबियांची वाताहत होतांना प्रत्यक्ष अनुभवलेले आहे,म्हणूनच तळमळीने आपण किती काळ असेच दुर्लक्ष करणार? किती वैफल्य पत्करण्याची वाट बघणार? आणि माझ्या कुटुंबावर ओढवले नाही ना तर मी का विचार करू ही भुमिका आपण केव्हा बदलणार? असे हे अगणित प्रश्न आमच्या घराघरात कधी शिरतात हे आम्हाला कळणारही नाही हे वास्तव तुमच्यासमोर दिसत असतांनाही किती दिवस असेच हात बांधून बघ्याची भुमिका घेणार???
बिडी सिगारेट,तंबाखू गुटका आणि रासायणिक घातकी शेतीला तसेच संकरीत (गायीच्या नव्हे)दुधालाही वेळीच फाटा देऊन गायी म्हशीचे दुध परिवारास द्या. हे शेतकर्यांना सहज शक्य आहे.
जे द्याल तेच परत मिळनार हा संस्कृतीचा नियम आपल्यालाही लागू होतो याची दखल घेत वेळीच सावध व्हा .
ज्या कुटुंबात कॅन्सरग्रस्त असेल त्यांना हि झळ किती आणि कशी भयानक आहे ?त्यांनीतरी पुढिल पिढीची वैद्यकिय जोखिम ओळखून त्वरीत रासायणिक शेती आणि संकरीत (गायी नव्हे जनावरं) खताला (बंदि घालून )आळा घालावा. इतरांना ही संबोधन करावे. व्यसनमुक्त समाजनिर्मितीकडे तसेच देशी गायी, म्हशी पाळण्याकरतां .इतरांचे लक्ष वेधावे.
केवळ शेणखत आणि सेंद्रिय शेती खुपच फायदेशीर आणि स्वस्त असून यासाठी इतरांना आग्रह करावा. मी स्व:त गेली तीन वर्ष सेंद्रियशेतीते प्रयोग/अनुकरण करून याचा खुप चांगला अनुभव घेत आहे.
अगदि मुबलक/कमी पाण्यातही ऊसासारखे पिकदेखील कमी खर्चात ( एकरी २५-३० हजार फक्त) ऊत्तम रित्या घेऊ शकतो हे सेंद्रिय प्रयोगाद्वारे सिध्द झालेले आहे. गोपालन केल्यास शेणखत आणि गोमुत्राचा वापर करून हा खर्च अजूनही नियंत्रित करता सेऊ शकतो.
कुटुंबातील स्व:त उभयतांनी सेंद्रिय शेतीप्रशिक्षण शिबीरात सहभाग नोंदवावा. सेंद्रिय शेतीचे फायदे समजून घेतलेतर एका देशी गायीपासून एका संपूर्ण कुटुंबाच्या शारिरीक आरोग्य संतुलनाची पुर्ण जबाबदारी घेतली जाते तसेच तीन एकर जमिनीची समृध्दी जपली जाते हे लक्षात येईल.
नंतर काळाची गरज ओळखून पंचकृशीतील युवकांच्या बरोबरीने सेंद्रिय शेतीप्रशिक्षण शिबीराचे आयोजन ही करावे.
युवाशेतकर्री मित्रांनी संघटित होऊन कृपया याविषयावर त्वरीत विचार करावा.
वृक्षलागवड , देशी गाय संवर्धन आणि सेंद्रिय शेती हि काळाची गरज आोळखलीच पाहिजे.
थायमेक्स, राऊंडप,कार्बाईड सारखी आत्मघातकी अतिविषारी औषधांचा वापर करून साठवलेले धान्य ,कांदे , फवारण्या मारून स्टेरॅाईड इंजेक्शन मारून वाढवलेल्या टवटवित दिसनार्या संकरीत भाज्या यातून होणारी (आपलीच )फसवणूक आतातरी थांबवा आणि आपली भावी पिढि वाचवा.
तणनाशकांचा वापर आतातरी त्वरीत थांबवा .ह्या अत्यंत घातक आणिअतिविषारी तननाशक , किटकनाशक औषधांवर अमेरिका सारख्या प्रगत देशाने कॅन्सरचे दुष्परिणाम लक्षात घेऊन थायमेक्स, राऊंडप यावर (४० वर्षांपूर्वीच) केव्हाच बंदि घातलेली आहे. तीच अमेरीकन कंपनी ही औषधे भारतात राजरोसपणे विक्री करून भारतीय चलन लुटत आहे आणि भारतीय शेतकरी आपल्याच कुटुंबावर घाला घालतांना दिसत आहे.
तंबाखुसेवनाला पुष्टी देनार्यांनी आतातरी तंबाखु गुटका सेवनाला त्वरित विराम देणे गरजेचे आहे.पूर्वापार चालत आलेल्या सेंद्रिय शेतीचे अवलंबन होण्यासाठी
आपल्या शेतकरी मित्रांना या चक्रव्यूहातून बाहेर काढण्यासाठी मदतीची/ दिलासा देण्याची अपेक्षा करणे स्वाभाविक वाटते.
आपल्या परिवारांत,जवळील माहितीतील मित्र, सगेसोयरे यापैकी कोणीही या असाध्य रोगांनी बळी पडू नये हिच अपेक्षा लक्षात घेऊन मी प्रामाणिक आव्हाहन करीत आहे.
आता सर्व बुध्दिजीवी विचारवंतांनीही या समाजप्रबोधन कार्यात आपला सहभाग नोंदवून आपआपल्या गावातील शेतकरी कुटुंबीयांचे समाजप्रबोधन करणे/होणे खुप खुप गरजेचे आहे.यासाठी काळाची गरज ओळखून आपणही सर्व सगेसोयरे मित्रपरिवार त्यांना तंबाखु व गुटकाबंदि, तसेच रासायणिक शेतीचे वाढते दुष्परिणाम यावर एकमेकांचे संबोधन करून समाजजागृतीचे हे महत्वाचे कार्य चालू ठेवलेच पाहिजे.
आयुर्वेद औषधोपचार तोही गरजेपुरताच असावा आणि सर्व शेतकर्री मित्रांनी स्व:तच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्याच्या आरोग्य रक्षणाची जबाबदारी लक्षात घेऊन रासायणिक शेतीऐवजी संपूर्ण सेंद्रिय शेतीवर भर द्यावा आणि संकरीत जनावराचे पालन करण्याऐवजी देशी गायीम्हशींचे पालन यावर भर द्यावा.
जे देणार (विकनार) तेच माघारी येणार या उक्तीचा विसर पडू देऊ नका. मोजकेच ऊत्पन्न चालेल परंतू मानवजातीला / स्व:तच्या कुटुंबाला/ समाजाला पोषक ठरेल अशाच ऊत्पादनावर भर द्यावा. तरच मानवजात भविष्यात आपली पिढि /वंश सुदृढ होण्याचे स्वप्न बघु शकते अन्यथा कर्करोगी भस्मासूराची वाताहत अटळ राहिल.
मी गेल्या १० वर्षापासून कमीतकमी ५० जणांची ☝️👎🏽“व्यसनमुक्ती”👎🏽☝️
हि वार्षिक जबाबदारी आजवर पाळत आलेलो आहे.आपण ही जबाबदारी समजून सुरूवात करावी.
धन्यवाद आभारी आहे. आपणास हार्दिक शुभेच्छा ,सुखसमृध्दि लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.
अरविंद औताडे मुंबई.
🌲🌹जय जय राम कृष्ण हरी 🌲🌹