Petition updateSAVE THE Fertile Soil ............LAND ON THE PLANET.

पाणी कुठं शोधणार ???

Arvind AutadayMumbai, India
Apr 4, 2019

 

पाणी कुठं शोधणार ???


पाणी म्हणजेच जीवन हि म्हणायला जेवढी सोपी तेवढीच कळायला अवघड वाटावी असेच आपण का वागतो याचा सरसकट विचार करण्याची वेळ आली आहे. 
आपण सर्व मानवजातीने जागृत राहून पाण्याचा योग्य वापर केला नाही तर येणारा काळ आपल्या पुढील पिढींसाठी फारच खडतर असेल . आपल्या आजूबाजूला फिरून बघितलं तर कालच वर्तमान पत्रात संगमनेर तालुक्यातील पठार भागात गावातील स्रियांना दिवसभर पोटासाठी वणवण फिरून  दररोज संध्याकाळी १००० फूट खोल दरीत उतरून कळशी पाण्यासाठी मेहनत करावी लागते . पाण्याचा थेंब थेंब आज वाचविणे  गरजेचे आहे त्यासाठी जमिनीचे  संवर्धन तसेच अधिक वृक्ष लागवड यावर लक्ष केंद्रित करून पाणी जमिनीखाली कसे जास्त साठवून ठेवू शकू यासाठी प्रयत्न केले तरच उद्यासाठी आणि येणाऱ्या पीढीस योग्य अशी स्थावर मालमत्ता राखून ठेवल्याचे समाधान मिळेल. 

Copy link
WhatsApp
Facebook
Nextdoor
Email
X