Actualización sobre la peticiónSAVE THE Fertile Soil ............LAND ON THE PLANET.

शेतकरी बांधवांनी कोणत्याही परिस्थितित जमिनी विकू नयेत.

Arvind AutadayMumbai, India
24 nov 2016
By Jitendra Bhosale शेतकरी बांधवांनी कोणत्याही परिस्थितित जमिनी विकू नयेत.जमिनीची कधींच नव निर्मिती होत नाही.बरेंच नेते व संघटना,शेतीतून बाहेर पडण्याचा सल्ला देतांत.तो फार मोठा चकवा आहें.हा व्यवसाय कमीत कमी पांच हज़ार वर्षें अखंड चालू आहें. बाकीचे उद्योग जगांत दिडशें-दोनशें वर्षापूर्वीच आलेंत.त्यांना आतां मंदीतून कोणीही बाहेर काढूच शकत नाही.संगणकांचा व्यवसाय देखील आणखीन ४० ते ५० वर्षें.सर्व उद्याेगांचे मुळ देखील शेतीच्याच वर अवलंबून आहें.देव-दैव,जात-धर्म,भविष्य, व अत्यंत टोकाच्या अंधश्रद्धेने आम्ही दैववादी व पर्यायाने आळशी बनलो.एका post मध्ये मी गजनीच्या महंमदाने सोमनाथ कसे लुटले लिहलेले आहें.सोमनाथच त्याला मारण्याची लाखो बिचारे भारतीय प्रतिकाराविना मंदिराभोवती वाट पहांत बसले होते.तो विनासायास लूट व लाखभर आमच्या बहिणींना घेऊन गेला. आमची शेती जगांत एक नंबरचीच आहें.शेतीयोग्य काळी कसदार भरपूर जमिन आहें.ओलिताखालील जमिन चीनपेक्षा देखील आमची जास्त आहें.एकूण ३२८.७ दशलक्ष हेक्टर पैकी फक्त१६९.७ दशलक्ष हेक्टर शेती लायक व त्यातील ९३७ लक्ष हेक्टर पडीकच आहें.याचाच अर्थ केवढी प्रचंड संपत्ति विनावापर पडून आहें. या सर्व जमिनी भूमिहिनाना कसण्यासाठी सरकारनें द्यावी यासाठी आमचे आंदोलन चालू आहें.ही संपत्ति मुख्य प्रवाहांत आली तर प्रचंड उत्पादन वाढेल याचीच प्रस्थापितांना फार भिती वाटते आहें.मुलभूत गरजासाठी उद्योगांतून फारच थोडी मदत होते. बांडगुळांसाठीच ती व्यवस्था असते.शेती इतका शाश्वत उद्योग जगांत व निदान आपल्या देशासाठी दूसरा नाही.अपारंपारिक ऊर्जा स्रोत देखील आमच्याकडे प्रचंड आहेत.थोडेसे संशोधन आम्हाला जगांत नंबर एक वर नेऊ शकते.उद्याेगाच्या प्रदूषणांवर देखील मी अनेंकदा लिहलेले आहें.त्यामुळे शेती न विकणे किती हिताचे आहें. विचार करा.शेतीला उद्योगांचा दर्जा मिळावा यासाठी देखील आंदोलन उभे करावे लागेल.आजचे सर्व नियोजन तुम्ही शेती विकावी असेच आहें.ती क़ायम तोट्यांत येईल अशीच व्यवस्था आहें.ते बदलावे लागेल.पूर्वी काय झाले या इतिहासांत मी आज जाऊं इच्छित नाही. -- शेत जमीन बिगर शेती करणे हा अक्ष्याम्या गुन्हा असावा परंतु असे असूनही सरकार मात्र त्यावर पांघरून घालून बसलंय असे दिसते । सगळीकडे अगदी खेड्या-पाड्या पर्यंत प्रगतीच्या नावाखाली ड्रीम सिटी चे जागोजागी फलक लागलेले दिसुनी हजारो एकर जमिनीला तारेचे कुंपण बघून मन हेलावते / अचंबित होते . कारण कुंपनात अडकलेली ती शेत जमीन आता पुन्हा कधीच शेतीसाठी वापरलीच जाणार नसते. आजच्या सामाजिक तसेच आर्थिक परीस्तीती नुसार शेतकरी हा फक्त जमीन विकू शकतो तो जमीन विकत घेउच शकत नाही, एकदा विकलेली जमीनदेखील निर्णय बदलूनदेखील तो परत इच्छा असूनही परत विकत घेउ शकत नाही कारण इसाऱ्या ची रक्कम त्याने खर्च केलेली असते.
Copiar enlace
WhatsApp
Facebook
Nextdoor
Email
X