Akshay DalviPune, India
Nov 3, 2021

#एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण झाल्यास जनतेचा होणारा फायदा

*��17% प्रवाशी कर असलेला तो रद्द होईल...*

*��टोल टॅक्स द्यावा लागणार नाही... म्हणजेच एसटीचे वर्षाला 3500 करोड रुपये वाचतील*

*��डिझेल वरील कर जो की महाराष्ट्र सरकारचा 27% आहे तो रद्द होईल..*

वरील सर्व पैसा वाचला म्हणजे तिकीट दरात जवळपास 40% कपात होऊ शकते

म्हणजेच जिथे 100 रुपयाचे तिकीट आहे तिथेच 60 रुपयेच द्यावे लागनार...

त्यामुळे प्रवाशी मायबाप जनता... यां महागाईच्या काळात आपला जर एवढा पैसा वाचणार असेल तर आपणही आपल्याला जमेल त्या प्रमाणे शासन दरबारी ही गोर गरीब जनतेची हक्काची असलेली एसटी ही

*राज्य शासनात विलीन करण्यासाठी हातभार लावावा आणि आज जो काही एसटी कर्मचारी रस्त्यावर उतरून लढत आहे त्यांना पाठिंबा द्या..*

प्रवाशी बांधवानो आज जर आपली ही लालपरी वाचली नाही तर खेडपाड्यातील जनतेचा विविध शहराशी असलेला संपर्क तुटेल आणि आणि भविष्यात होणाऱ्या विकासपासुन सुद्धा आपण खूप लांब राहू..

कारण ही एसटी म्हणजे फक्त एक साधन नाही तर महाराष्ट्रातील 11 कोटी गोर गरीब जनतेच एक हक्काच साधन आहे....

त्यामुळे हे काहीही करून टिकलेच पाहिजे..

कारण खेड्यातील प्रत्येक व्यक्ती स्वतःची गाडी घेऊ शकत नाही मित्रांनो..

त्यामुळे यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा जेवढा फायदा आहे तेवढाच फायदा सर्व सामान्य जनतेचा पण आहे...

सध्या कर्मचाऱ्याकडून सुरु असलेल्या आंदोलनामुळे आम्ही ज्या प्रवाशांना आमचे दैवत मानतोत त्या सर्व जनतेचे सध्या आमच्या आंदोलनामुळे नक्कीच त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागत असेल त्यामुळं एक लाख एसटी कर्मचाऱ्याच्या वतीने आम्ही महाराष्ट्रातील 11 कोटी जनतेची माफी मागत आहोत..

*कृपया करून आम्हा एक लाख एसटी कर्मचाऱ्यांना एक माणूस म्हणून माणुसकी यां नात्याने समजून घ्या..*

*समस्त एसटी कर्मचारी*
������������������

Copy link
WhatsApp
Facebook
Nextdoor
Email
X