Petition updateAppeal to make Nigdi as starting point for Pune Metro phase 1

Citizen protest and signature campaign on 26 Jan 2020

Amol DeshpandePimpri-Chinchwad, India
Jan 27, 2020

कालही आजही आणि उद्या सुद्धा! मेट्रो फेज १ ला निगडी पर्यंत मंजुरी मिळत नाही तोपर्यंत नागरिकांचा लढा आम्ही सुरुच ठेवणार... या मागणीसाठी आम्ही २०१२ (८ वर्षे!) पासून पाठपुरावा करत आहोत, रस्त्यावर मानवी साखळी, उपोषण, ऑनलाईन स्वाक्षरी मोहीम, मेट्रो अधिकारी व लोकप्रतिधींची भेट घेऊन आम्ही आमची मागणी मांडत आलो आहोत. परिणामी २०१८ साली महामेट्रोने चिंचवड ते निगडी विस्ताराचा प्रकल्प अहवाल तातडीने पूर्ण केला ज्याला पालिकेने आणि राज्य सरकारने तत्काळ मंजुरी दिली. केंद्राकडे सध्या हा विषय मंजुरीला आहे परंतु ११ महिने होऊनही यावर निर्णय न होणे हि फारच आश्चर्याची गोष्ट आहे! आम्ही पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो कि निगडी पर्यंत मेट्रो विस्ताराला तत्काळ मंजुरी द्यावी, आम्हा पिंपरी-चिंचवडकर नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका

We citizen of Pimpri-Chichwad are demanding Pune Metro phase 1 extension till Nigdi since 2012. MahaMetro did DPR in 2018 and subsequently local municipal corporation PCMC and State govt Maharashtra gave sanction. Extension Proposal is currently lying at GoI for approval for last 11 months! It's very surprising and testing the patience of citizens of Pimpri-Chinchwad 

Copy link
WhatsApp
Facebook
Nextdoor
Email
X