जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या संकटाचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक मजबूत करणे

The Issue

१० जून २०२०: आज आपल्या जळगाव शहरात घडलेली अतिशय दुर्दैवी घटना -

शासकीय महाविद्यालयातील कोविड रुग्णालयातील शौचालयात एका कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृतदेह आढळून आला. या महिलेला ऍडमिट केल्यावर दुसऱ्याच दिवशी विचारपूस करण्यासाठी संपर्क केल्यावर रुग्ण आढळून न आल्याने नातेवाईकांनी थेट पोलीसात तक्रार दिली होती. मात्र या महिलेचा मृतदेह आज रुग्णालयातील एका शौचालयात आढळून आला यावरून प्रशासनाचा गलथानपणा सामोर येतोय. प्रशासनाच्या अशा चुकांमुळे आणि नाकर्तेपणामुळे अशा अनेक घटना समोर येत आहेत.

जळगाव जिल्ह्यात आजतागायत १३९५ रुग्ण आढळले आहेत. मागील दोन दिवसात दर दिवशी १०० पेक्षा अधिक रुग्ण वाढले आहेत. कोरोना बरोबर आता राहायला शिकलं पाहिजे हे अगदी बरोबर आहे पण जर अशी आरोग्य व्यवस्था असेल तर कसे होणार?

कोरोना गरिबी श्रीमंती बघून होत नाही आणि दुर्दैवाने जर तो कोणाला झाला तर अशीच आरोग्य यंत्रणा आपल्या उपचारासाठी असणार आहे.

जळगावकरांनो आपल्याला सहन करण्याची सवयच लागली आहे. रस्त्यावरील खड्डयाप्रकरणी आपल्यापैकी अनेकांच्या अक्षरशः कंबरी तुटल्या तरीपण आपण सहनच केले परंतु आजपण जर सहन कराल तर स्वतःचा किंवा जवळच्या एखाद्या व्यक्तीचा अंतही सिविल हॉस्पिटलच्या शौचालयात होऊ शकतो. तेव्हा मला काहीही होत नाही, मी सेफ आहे असा विचार न करता या गलथान कारभाराविरुद्ध सर्व मिळून आवाज उठवूया.

हे पत्रं मी केंद्रीय आरोग्यमंत्री मा. डॉ. हर्षवर्धनजी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री मा. राजेशजी टोपे, CMO आणि PMO यांना आपल्या सर्वांच्या वतीने लिहीत आहे. कृपया जास्तीत जास्त स्वाक्षऱ्या करून यावेळी आपला आवाज सरकारपर्यंत पोचवूया.

मी सरकारला विनंती करतो कि त्यांनी जळगावच्या या वाढत्या प्रादुर्भावाकडे आता प्राथमिकतेने लक्ष द्यावे आणि जिल्ह्यातल्या कोविड केअर सेंटरची बेड कॅपॅसिटी वाढवून येथील आरोग्य यंत्रणा तात्काळ मजबूत करण्याकडे भर द्यावा. तसेच जिल्ह्यात कोरोना कम्युनीटी स्प्रेड स्टेज वर असल्याने टेस्टिंग फॅसिलीटीज वाढवून संपूर्ण जिल्ह्यासाठी कोविड मॅनेजमेंट टीमचे त्वरित गठन करावे.

धन्यवाद

This petition had 1,047 supporters

The Decision Makers

State Health Minister Shri. Rajeshji Tope

Central Health Minister Dr. Harshwardhan

Petition Updates