सांप, वन्यजीवो के साथ स्टंट करना फोटो व्हिडीओ बनाना सोशल मीडिया द्वारा व्हायरल करना अपराध

पेटीशन बंद हो गई

यह पेटीशन 1,482 हस्ताक्षर जुट गई

समस्या

 

 

भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मध्ये भारत सरकारने मंजूर केला. वन्यप्राण्यांचे अवैध शिकार, मांस आणि अवयवांचा व्यापार रोखणे हा त्या मागचा हेतू होता. याला सन 2003 मध्ये सुधारित करण्यात आले. त्यानंतर त्याचे नाव भारतीय वन्यजीव संरक्षण (सुधारित) कायदा 2002 असे करण्यात आले आहे 

या कायद्यानुसार अनुसूची  मधील समाविष्ठ कोणतेही वन्यजीव पकडण्याचा , हाताळण्याचा, त्यांचे प्रदर्शन करण्याचा , त्यांच्या सोबत फोटो, व्हिडीओ करण्याचा आणि त्यांचे नुकसान करण्याचा प्रयत्न करणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. याशिवाय अभयारण्यात वन्यजीवांसाठी शस्त्रे घेऊन प्रवेश करण्यास मनाई आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत जंगलातील झाडे तोडण्यास किंवा तोडण्याचा प्रयत्न करण्यास मनाई आहे. यासह वन्यजीवांचे शरीर, अंग, अवशेष आणि वन्यजीवांच्या त्वचेचा व्यापार करणे त्यांना सजावट म्हणून वापरणे यावर पूर्णपणे बंदी आहे असे करतांना आढळून आल्यास यावर कठोर शिक्षेची तरतूद आहे 

Subject , Regarding violation of notification of wildlife protection by social media like YouTube, Tik Tok and Facebook.

 

Respected sir, 

We had complained online about above mentioned subject to your office on 21 September 2018 and 11 November 2019, but still no action has been taken regarding this subject. Even today the videos of snakes and other animals are published. In these, animals are used and the following laws are being violated.

1) Due to exhibition and non- scientific and unwanted handling of wild animals, the notification of wildlife protection 1972 is violated. These animals are kept in the small  jars and sacks. Such improper handling and keeping in captivity of snakes and other animals is life threatening to them and violating the Wildlife protection law.

2) Venomous animals like Cobra, Russell's Viper and scorpions are handled without any pre-permission and training. Activities like Cobra kissing has taken many lives, news about such instances is read many times in newspapers. Committing such acts are considered attempt of suicide. These crimes are rising in the society by misuse of social media. As many youngsters are easily  attracted towards such thrilling acts giving them cheap popularity.That's why such acts are on rise in society. This is causing violation of law.

The persons indulging in such acts are of course guilty but the social media which while knowing such acts are subject to crime, allow such content to be published. Hence such social media platforms should also be held guilty. We once again request honorable Prime Minister to look into this matter and take action against facebook, YouTube,  Tik Tok for circulating such content. And also remove such content from these medias.

 

Yours faithfully 

Balkrishna devre, founder vjss jalgaon maharashtra

 

 

जे प्रामाणिक प्रयत्न करत वनविभागाच्या माहितीत नागरी रहिवासातून सर्प वाचवतात सर्पांबद्दल जनजागृती करतात  ते सर्पमित्र आहेत 

आणि जे हौस म्हणून साप पकडतात ,सापांसोबत स्टंट करतात , ते स्नेक कॅचर आहेत आणि समाजात सध्या कॅचर ची संख्या वाढत आहे यात बहुतेक महाविद्यालयीन शिक्षण घेणारे आणि ग्रामीण भागातील अर्धशिक्षित तरुण जास्त आहेत ही चिंतेची बाब आहे अश्या लोकांवर कारवाई झालीच पाहिजे 

*यु ट्यूब वरील सापांचे व्हिडीओ बघून साप पकडतांना होत आहेत दुर्घटना*

नुकतेच वर्धा जिल्ह्यात 2 तरुणांनी यु ट्यूब बघून साप पकडायचा प्रयत्न केला बिनविषारी कवड्या साप समजून मण्यार पकडली त्याच्या दंशा कडे दुर्लक्ष केले आणि जीव गमावला 

जळगाव जिल्ह्यात शिवाजी नगर परिसरातील धनंजय काळे नगरात 20सप्टेंबर 2018 रोजी गल्लीत साप निघाल्याची ओरड सुरू झाली एक दोघांनी सर्पमित्रांना बोलालवले देखील सर्पमित्र पोचण्याच्या आधी त्याच भागात राहत असलेला एक तरुण जेवणाच्या ताटा वरून उठून साप पकडायला धावला आणि घात झाला ,

वय 22 कामा वरून घरी आला जेवायला बसला आणि घराजवळ साप निघाल्याची माहिती भेटली घरा जवळ साप निघाला म्हणून जेवण सोडून मदतीला गेला साप पकडता येत नाही सापांबद्दल ओळख नसतांना कोणत्याही सुरक्षा साधना शिवाय त्याने सापाला पकडण्याचे प्रयत्न केले आणि व्हायचे तेच झाले पकडत असताना साप चावला चावलेला साप कोणता हे पण त्याला सांगता आले नाही लक्षणे आणि वर्णनावरून सोनू  ला चावलेला सर्प कोब्रा होता असे समजले . 

 कोब्रा  चावल्या वर देखील अशास्त्रीय पद्धतीने प्रथमोपचार केले एखाद्या पिक्चर मध्ये दाखवतात त्या प्रमाणे चावलेल्या जागी तोंडाने रक्त ओढून काढले नंतर सिव्हिल ला दाखल झाले अति धाडस जीवावर बेतू शकते याची कल्पना नसलेला तरुण जीवानिशी गेला असता.

दुसरी घटना दादा वाडी मंदिरा जवळ एक नागरिकाला साप दिसला छोटासा साप आहे आपण पकडून घेऊ या विचाराने साप पकडला आणि प्लास्टिक च्या बरणीत साप टाकत असताना निसटला सरळ गाडीच्या डिकीत गेला मग सर्पमित्राला बोलावले सर्पमित्र घटनास्थळी पोचले तेव्हा त्या व्यक्तीने खूप गरीब आणि शांत बसलेला साप होता म्हणून मी पकडत होतो हातातून निसटला असे सांगितले  

सर्पमित्रांनी गाडीतून साप रेस्क्यू केला वाचवलेला साप विषारी मण्यार होता सुदैवाने सदर व्यक्तीस मण्यार चावला नाही म्हणून पुढील अनर्थ टळला 

अश्या घटना सध्या वाढत आहेत सोशल मीडिया, यु ट्यूब , या सारख्या माध्यमातून अनेक लोक साप पकडणे खूप सोपे आहे  म्हणून माहिती नसतांना स्वतःच साप पकडायला पुढे येत आहेत आणि स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत,

यु ट्यूब वरील भारतीय वन्यजीव अधिनियम 1972 च्या तरतुदींचा भंग करणारे आणि चुकीच्या पद्धतीने दिली जाणारी माहिती मुळे भविष्यात जीवितहानी घडू शकते असे गंभीर परिणाम कारक व्हिडीओ चॅनल यु ट्यूब द्वारा बंद करावेत या बद्दलच्या तक्रारी वन्यजीव संरक्षण संस्था जळगांव तर्फे मी पंतप्रधान कार्यालय भारत सरकार, 

वने आणि पर्यावरण मंत्रालय भारत सरकार, 

मा . मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, 

मा. वनमंत्री महाराष्ट्र राज्य , 

मा. प्रधान सचिव वने महाराष्ट्र, मा. मुख्य वनसंरक्षक , याना सदर तक्रारी पाठवल्या आहेत 

avatar of the starter
वन्यजीव संरक्षण बहुद्देशीय संस्था, (सातपुडा बचाव कृती समिती) जळगांवपेटीशन स्टार्टर

फैसला लेने वाले

मा मुख्यमंत्री साहेब
मा मुख्यमंत्री साहेब
मुख्यमंत्री कार्यालय , मुंबई महाराष्ट्र

पेटीशन अपडेट