कुंभमेळ्यापूर्वी नंदिनी नदीचे संपूर्ण पुनरुज्जीवन करा

समस्या

प्रति,
श्रीमती हिमगौरी आहेर आडके - मा. महापौर, नाशिक मनपा
श्रीमती मनीषा खत्री - मा. आयुक्त, नाशिक मनपा
श्रीमती पंकजा मुंडे - मा. मंत्री पर्यावरण आणि हवामान बदल, महाराष्ट्र राज्य
श्री. गिरीश महाजन - मा. मंत्री, आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्र राज्य

महोदया/महोदय,

नुकतीच नाशिकमध्ये नंदिनी नदीची 'महास्वच्छता मोहीम' पार पडली. या मोहिमेत हजारो नाशिककर उत्साहाने सहभागी झाले, ही एक सकारात्मक बाब आहे मात्र नदीची प्रत्यक्ष परिस्थिती चिंताजनक आहे. केवळ एका दिवसाच्या स्वच्छता मोहिमेने किंवा घनकचरा (Solid Waste) उपसल्याने नंदिनी नदी खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेऊ शकत नाही.

सजग नाशिककर म्हणून आम्ही या याचिकेद्वारे नदीच्या शाश्वत आणि कायमस्वरूपी पुनरुज्जीवनासाठी खालील मागण्या करत आहोत.

Urgent - शहरी भागातील गाळ काढणे (De-silting) : वर्षानुवर्षे येणाऱ्या पुरासोबत वाहून आलेली माती नदीच्या पात्रात, विशेषतः  वळणांच्या ठिकाणी जमा झाली आहे. यामुळे नदीचे पात्र गाळाने पूर्णपणे भरले आहे यामुळे नदी किनाऱ्यावरील सखल भागात सतत पुराचा धोका तयार होतो. हे पात्र तातडीने खोल आणि रुंद करावे. रुंदीकरण झालेल्या नदीकाठावर riparian buffers तयार करावेत. 

नंदिनी नदी आणि ओढ्यांवरील अतिक्रमण रोखणे : नदीवर आणि नदीच्या ओढ्यांवर होणारे अतिक्रमण थांबवून सर्व नैसर्गिक ओढ्यांना (नाल्यांना) गॅबियन तटबंदी करावी जेणेकरून या ओढ्यांमध्ये भविष्यात अशाप्रकारे अतिक्रमणे होत राहणार नाहीत.

Urgent - केमिकल आणि सांडपाणी (Sewage) रोखणे: नदीत केवळ कचरा नाही, तर सांडपाणी आणि औद्योगिक कंपन्यांचे रासायनिक पाणी (Chemicals) थेट सोडले जात आहे. यामुळे नदीचे पाणी पूर्णपणे काळे पडले आहे. अशा सर्व जागा शोधून त्यावर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात यावी. यासाठी अत्यंत प्रदूषणकारी अशा अंबड, सातपूर, सिडको भागात sewage आणि chemical ऑडिट करावे. 

Urgent - STP आणि CETP चे काम युद्धपातळीवर पूर्ण करणे: सातपूर आणि अंबड एमआयडीसी (MIDC) परिसरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) आणि रासायनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (CETP) यांचे काम युद्धपातळीवर आणि पूर्ण कार्यक्षमतेने (Efficiency) करण्यात यावे.

नैसर्गिक संगमाचे रक्षण व्हावे: नंदिनी आणि गोदावरी नदीचा संगम हा आमचा 'नैसर्गिक संगम' आहे. पावसाळ्यानंतर नदीचा प्रवाह थेट STP कडे वळवण्याचा जो प्रस्ताव आहे, तो निसर्गनियमाविरुद्ध आहे.

नंदिनीला केवळ 'नाला' म्हणून न वागवता एक 'नदी' म्हणूनच तिचे अस्तित्व जपले जावे आणि संगमाचे नैसर्गिक रूप अबाधित राहावे. संगमावरील एसटीपीला प्राधान्य न देता प्रदूषणकारी MIDC भागातील STP आणि CETP च्या कामाला प्रशासकीय गती द्यावी. यासाठी गरज पडल्यास आर्थिक निधीची तरतूद कुंभमेळा निधीतून करावी कारण गोदावरी आणि नंदिनी संगमावरही मोठ्या प्रमाणात भाविक येणार आहेत. 

कुंभमेळा काळात नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात भाविक येणार आहेत, त्यांच्या आणि नाशिककरांच्या आरोग्याचा विचार करून नंदिनी नदीच्या पुनुरुज्जीवनसाठी युद्धपातळीवर पावली उचलावीत. नाहीतर नदीतील प्रदूषण, backfilling आणि संभाव्य पुरामुळे होणाऱ्या आरोग्याच्या प्रश्नाची आणि जीवित अथवा वित्तहानीची जबाबदारी निश्चित करावी.

(टीप: या याचिकेला जास्तीत जास्त नाशिककरांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ही याचिका मोठ्या प्रमाणावर शेअर करा. )

avatar of the starter
Roshan Kedarपेटीशन स्टार्टर

1

चलिए 5 हस्ताक्षरों तक आगे पहुँचते हैं!
1,000+ समर्थकों वाली पेटीशन्स के जीतने की संभावना 5 गुना ज्यादा होती है!

पेटीशन अपडेट