Update petisiSupport De-Silting of Ghanewadi Lake at Jalna 2024*दूर करो संकट हनुमान...* 
Sunil RaithathaJalna, India
23 Apr 2024

*दूर करो संकट हनुमान...* 

घाणेवाडी तलाव गाळमुक्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहेच..तलावाचे सांडवे आणि भिंत फक्त नावालाच असून कधीही पाण्यासोबत वाहून जाऊ शकते असं तज्ञाचं मत आहे. तलावाच्या सांडव्याची-भिंतीची दुरूस्ती करण्यात यावी म्हणून आपण सतत पाठपुरावा करत आहोत.तलावातील पाण्याच्या संरक्षणासोबतच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचे, पशूधनाचे, शेतजमिनीचे कधीही भरून न येणारे नुकसान होण्याची शक्यता आहे. सर्वच मार्ग बंद झाल्याची भावना बळावली असून आता देवाचाच धावा करावा लागणार.. आणि त्याच अनुषंगाने हनुमान जन्मोत्सवानिमित्त सर्व संकटांचे मोचन करणाऱ्या हनुमंतालाच आवाहन करावे याचसाठी *हनुमान चालिसा पठण* आयोजित केलेले असून आपण अवश्य सहभागी व्हावे..

Salin tautan
WhatsApp
Facebook
Nextdoor
Email
X