Support Forest Park at Taljai Hill, Save the hill from Privatization

0 व्यक्ति ने साइन किए। 500 हस्ताक्षर जुटाएं!

500 साइन के बाद इस पेटीशन को लोकप्रिय पेटीशनों में फीचर किए जाने की संभावना बढ़ सकेगी!

सध्या तळजाई टेकडी संदर्भातला वाद गाजत आहे. वाद हा टेकडी संवर्धन करण्याकरिता व्हायलाच हवा पण तत्पूर्वी काही महत्त्वाचे मुद्दे या टेकडीच्या इतिहासाबाबत एक जाणकार म्हणून सांगू इच्छितो. 

१. तळजाई टेकडीवरील १०८ जागेच्या मालकी  अधिकारावरून (ही जागा वन खात्याच्या अखत्यारीतील नाही. ) न्यायालयीन वाद सुरू आहे. आपण सर्व टेकडी संवर्धनासाठी जागरूक आहोत ही चांगली बाब आहे परंतु कायदेशीर बाबिंमधून टेकडीची मुक्तता व्हायची असेल तर एक action plan असणे अत्यंत गरजेचे आहे कारण तांत्रिक मुद्दे मांडूनच टेकडी वर होणारे खाजगीकरण थांबू शकते. आणि त्याकरिता महापालिकेने टेकडीवर वन उद्यान नियोजित केले असेल तर टेकडीची जागा वाचविण्यासाठी त्याचा उपयोगच होईल. 

२. समजा महानगरपालिका न्यायालयापुढे टेकडीवरील जागेबाबत काहीच मुद्दे उपस्थित करू शकली नाही अथवा कोणताही आराखडा अथवा नियोजन मांडू शकले नाही तर नियमाप्रमाणे खाजगी प्लॉट धारकांना तिथे फार्म हाऊस पद्धतीने घरे विकसित करण्याची संधी मिळेल. मग टेकडीवरील निवासिकरण कायद्यानुसार कोणीही थांबवू शकणार नाही. 

३. टेकडीवर असलेल्या पाण्याच्या टाकीच्या बाजूला महानगर पालिकेच्या ताब्यात असलेल्या काही जागांवर झोपडपट्टी होण्यास सुरुवात झाली आहे. नियोजनबद्ध आराखडा टेकडीसाठी नसेल तर तिथे झोपड्यांचे अतिक्रमण लवकरच सुरू होईल

४. महापालिकेने तळजाई टेकडीवर 108 एकर जागेसाठी तयार केलेल्या मास्टर प्लॅन बाबत नागरिकांनी दिलेले सल्ले महापालिकेने निश्चितच विचारात घ्यावेत परंतु त्याआधी खाजगीकरना पासून टेकडीच संरक्षण करणे हे सर्वात मोठे चॅलेंज आहे.

आता तळजाई वर नियोजित करण्यात आलेल्या आराखड्या विषयी जी माहिती घेतली त्यातली काही ठळक वैशिष्ठ्ये एथे नमूद करत आहोत  

१. यांप्रकल्पा अंतर्गत ४० एकर मध्ये मोठे उद्यान, पुण्यातील सर्वात मोठी nursery, लहान मुले तसेच महिलांसाठी स्वतंत्र क्रीडांगण व क्रिकेट ग्राउंड उभारण्यात येईल. प्रकल्पाची पहिली फेज म्हणून उभारण्यात आलेल्या क्रिकेट ग्राउंड चां आज लाखो लोक उपभोग घेत आहेत

२. तळजाई हे टेकडीला असलेले नाव एका तळ्यामुळे मिळाले जे वन विभागाच्या हद्दीत असून सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तळजाई येथील नियोजित प्रकल्पामध्ये रेन वॉटर हार्वेसटिंग करून एक मोठे तळे उभारण्यात येईल ज्यामुळे उद्यानाला असणारी पाण्याची गरज संपेल. या तळ्यामुळे जवळपास ३०० लाख लिटर पानी हे रेन वॉटर हरवेस्टिंग पद्धतीने उपलब्ध होईल 

४. या प्रकल्पा अंतर्गत टेकडीवर सुमारे ६०००० देशी झाडे लावण्यात येतील तसेच टेकडीवर असणाऱ्या दुर्मिळ वनस्पतींचे संवर्धन केले जाईल. 

५. टेकडीवर होणारी वाहनाची वाहतूक थांबविण्ासाठी टेकडीच्या मुखाला वाहने लावण्याकरिता पार्किंग केलें जाईल. जे एकूण क्षेत्राच्या केवळ १ टक्के भागामध्ये असेल.  पार्किंग झाल्यानंतर टेकडीवर होणारी वाहतूक थांबविण्यात येईल व केवळ पादचारी आणि सायकल चालविणाऱ्या लोकांना प्राधान्य दिले जाईल. 

६. या प्रकल्पामध्ये एकही नवीन काँक्रिट चां रस्ता बांधण्यात येणार नाही. या उलट अस्तित्वात असलेल्या रस्त्याला केवळ पादचारी आणि सायकल करिता खुला केला जाईल.

प्रकल्पाबाबत काही त्रुटि असतील तर महापालिकेला जरूर कळवा परंतु खाजगीकरणापासून टेकडी वाचवायची असेल तर तळजाई येथील नियोजित वन उद्यान प्रकल्पाला साथ द्या.