Petition updateProvide separate bike lanes in Pune for rider safety
Provide separate bike lanes in Pune for rider safety

shivanand jamakhandiIndia

Nov 5, 2026
नमस्कार मित्रांनो,
आपण मोहीम सुरू केल्यापासून अवघ्या काही तासांत ११ पुणेकरांनी स्वाक्षरी करून पाठिंबा दिला आहे, त्याबद्दल धन्यवाद!
आज एक मोठी बातमी समोर आली आहे - पुणे महानगरपालिकेने (PMC) शहरातील सायकल ट्रॅकची दुरवस्था मान्य केली असून, सुरक्षित वाहतुकीसाठी ७५ किलोमीटरचे नवीन सायकल नेटवर्क विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे.
आपली मागणी यापेक्षा वेगळी नाही! जर प्रशासनाकडे सायकल ट्रॅकसाठी जागा आणि बजेट आहे, तर रोज रस्त्यावर उतरणाऱ्या २५ लाख बाईक रायडर्सच्या सुरक्षेसाठी 'स्वतंत्र बाईक लेन' का नाही?
कृपया ही लिंक तुमच्या आणखी ५ मित्रांना शेअर करा, जेणेकरून आपण लवकरच २५ स्वाक्षऱ्यांचा पुढचा टप्पा गाठू शकू!
- पुणे व PCMC बाईक लेन
मूव्हमेंट
Support now
Sign this petition