Akshay DalviPune, India
Aug 7, 2021

कामगार मित्रांनो,
एसटीच्या ७० वर्षाच्या इतिहासात जेवढा तोटा झाला नाही तेवढा तोटा माजी परिवहन मंत्री साहेबांच्या या पाच वर्षांच्या कार्यकाळात झाला आहे. ऐकुन तुमचे *डोळे विस्फारतील* म्हणजे तब्बल एसटीचा संचित तोटा हा *५०००/-रु. कोटींच्या पूढे* पोहचला आहे. मित्रांनो हा तोटा भरायला पुढची *२५ वर्ष* कमी पडतील एवढा अवाढव्य हा तोटा करुन ठेवला आहे. या तोट्याची तुम्हाला कारणे सांगण्याची आवश्यकता नाही कारण तुम्ही स्वत: हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे. *७० वर्षात* जेवढे टेंडर व जाचक परिपत्रके निघाले नाहीत तेवढे टेंडर व जाचक परिपत्रके या *५ वर्षांच्या* काळात निघाले आहेत.
साहेबांच्या काळात निघाल्यामुळे *एसटी डबघाईला आली...*

♦️ १. *शिवशाही-* खाजगी शिवशाहींचा एसटीमध्ये शिरकाव केला त्यात शिवशाही बस खाजगी, अप्रशिक्षित खाजगी चालक, प्रती किमी. २१रु. दराने भाडे एवढा खर्च करण्यात आला. यामुळे शिवशाहीच्या अपघातात भरमसाठ वाढ झाली या काळात सुमारे ५०० अपघात शिवशाहीचे पहायला मिळाले अनेक प्रवाश्यांचे बळी गेले.
♦️२. *संत गाडगेबाबा स्वच्छता प्रकल्प-* यासाठी ब्रिक्स इंडिया प्रा.लि.कंपनीला तब्बल ४४७ कोटी रुपयांचे टेंडर देण्यात आले. कारण नसतांना खर्च केला गेला स्वच्छतेत मात्र काडीमात्र फरक पडला नाही. परंतू यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या मृत व्यक्तीच्या वारसांना अनूकंपा तत्वावरील नौकर्यांवर पाणी सोडावे लागले.
♦️३. *गणवेश-* एसटी कर्मचाऱ्यांच्या गणवेशासाठी तब्बल ७२ कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले, त्यामुळे एका गणवेशाची किंमत ६ ते ७ हजार रुपयांपर्यंत गेली प्रत्यक्षात हा गणवेश एखाद्या गोणपाट सारखा झाला, कोणालाही योग्य मापाची गणवेश दिली गेली नाहीत . चालक-वाहक प्रवाश्यांसमोर विदूषकांसारखे दिसू लागले जनमाणसात एसटी ची प्रतिमा मलीन झाली.
♦️४. *वायफाय-* VOOT.COM ह्या वेबसाईटला कनेक्ट केलेले वायफायने लोकांना वेड्यात काढले. वायफाय हाय काय हेच समजण्यात बंद पडल .
♦️५. *हॉस्पिटल-* पुणे येथे मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल एसटी च्या मोक्याच्या जागा नजरेत ठेवून काढण्यात येऊन एसटीच्या जागा खाजगी कंत्राटदारांच्या घशात घालणार आहेत.
♦️६. *मराठी भाषा दिनानिमित्त* मुंबई सेंट्रल बसस्थानकात सर्व वेळापत्रकाची वाट लावून हा कार्यक्रम केला. कित्येक बस्थानकच बंद करण्याचा घाट आखला गेला.
♦️७. *जाहिरात* बाजी याच्यावर अवाढव्य खर्च केला गेला स्वत: ला परिवर्तक म्हणून घोषीत केले.
♦️८. *चालक तथा वाहक* भरती करुन वाहक पद नाहिसे केले.
९. ईटिआयएम मशीनची दुरावस्था
♦️१०. *दिवाळी भेट* देतांना कर्मचारी व अधिकारी असा भेदभाव करुन वेगळा पायदंडा निर्माण केला.
♦️११. *एकतर्फी पगारवाढ* देवून हूकूमशाहीचा कळस गाठला ज्यांना पगारवाढ मान्य नाही म्हणे त्यांनी २० हजार रु.पगारावर कंत्राटी पद्धतीने काम करा अशी धमकी दिली.
इ. असे भरपुर आहे लिहिण्यासारखे.

Copy link
WhatsApp
Facebook
Nextdoor
Email
X