

मायबाप सरकार व अधिकारी वर्ग ,
गृहनिर्माण आणि सहकार खाते किती दिवस अपार्टमेंट रहिवांसी यांच्या कडे दुर्लक्ष करणार आहे ?
थोडा विचार करा आणि खालील प्रशनांची उत्तरे द्या
- सोसायटी स्थापने (गृह निर्माण संस्था ) साठी जर ५१% रहिवांसी गरजेचे आहेत तर अपार्टमेंट साठी फक्त ५ रहिवासी का ?
- अपार्टमेंट स्थापने साठी पण ५१% रहिवांसी गरजेचे का नाहीत ?
- सोसायटी (गृह निर्माण संस्था ) किंवा अपार्टमेंट निवडायचा अधिकार घ्राहकांना का नाही ?
- ९७ व्या घटना दुरुस्ती नुसार सहकारी गृहरचना संस्था स्थापन करणे हा सदनिका धारकांचा मुलभूत अधिकार नाहि का ?
- १० पेक्षा जास्त गाळे असतील तर सदनिका लोकशाही मार्गाने अपार्टमेंट मध्ये चालू शकते का ?
- अपार्टमेंट ऍक्ट ला गाळे अथवा फ्लॅट्स संख्या चे बंधन का नाही ?
- अपार्टमेंट डीड घोषणा पत्र बिल्डर ला एकतर्फा का करता येते ? ५१% रहिवांसी लोकांना त्यात सामावून घेणे गरजेचे नाही काय ?
- अपार्टमेंट पाहिजे कि सोसायटी (गृह निर्माण संस्था) पाहिजे याचा अधिकार ५१ % लोक मिळून का नाही करू शकत ?
- बिल्डर ने जर ३ महिन्या मध्ये सोसायटी किंवा अपार्टमेंट नाही बनवले तरी देखील पहिला अधिकार बिल्डरलाच का असतात ?
- बिल्डर सोसायटी (गृह निर्माण संस्था) पेक्षा अपार्टमेंट ला पसंदी का देतात ? त्याचे अधिकार अपार्टमेंट स्थापन केल्यावर पण का असतात ?
- अपार्टमेंट स्थापन झ्ह्यालास ५१ % लोक मिळून त्याला सोसायटी (गृह निर्माण संस्था ) का नाही करू शकत ?
- डीड ऑफ अपार्टमेंट रद्द करण्याचे अधिकार फक्त बिल्डर ला का आहे ? ५१ % लोक मिळून डीड ऑफ अपार्टमेंट रद्द का नाही करू शकतं ?
- अपार्टमेंट किती स्थापन जहाले याची नोंद सहकार ख्यात्या कडे आहे काय ?
- १० किंवा अधिक गाळे / फ्लॅट्स असून देखील अपार्टमेंट स्थापन होणे हे भविष्यासाठी किंवा लोकशाही साठी मारक नाही काय ?
- आपण कधी अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट १९७० बदला बद्दल मागच्या ४० वर्षात कधी विचार केला आहे काय ?
- दिवाणी न्यायलयात दावा दाखल करावा लागत असणे, दिवाणी न्यायालयत जाण्याचीबाब खर्चिक आणि वेळखाऊ या बद्दल कांही माहिती नाही का ?
- आणखी किती दिवस असा अन्याय चालणार आहे ? किती दिवस अपार्टमेंट हे सरकारी कागदावर येणार आहे ?
- आणि शेवटी आजही सहकार ख्याताचा विश्वास बिल्डर वरतीच आहे काय ?
कृपा करून स्वताला आणि आम्हाला अश्या जुन्या कायद्यातून मुक्तता करा
देवकृपे ने आपणास लोकसेवेची संधी प्राप्त जहाली आहे आणि आशा आहे आपण सर्वाना न्याय देण्यासाठी प्रयत्न कराल .
माझ्या इमेल्स मुळे होत असलेला त्रासाबद्दल दिलगिरी पण माझ्या सनदिकेतील १७२ गाळे धारकांपैकी ५१% पेक्षा जास्त लोकांनी मला सोसायटी रेजिस्ट्रेशन करणे हे काम सोपवले आहे ते काम मी आता मरे पर्यंत सोडणार नाही. अपार्टमेंट धारकांना माणूस म्हणून स्वीकारा व उचित बदल करा हि विनंती. शेवटी चूक बिल्डर किंवा त्याचे अपार्टमेंट डीड केलेले 5 चमचे किंवा अधिकारी कांरणे भूत नसून खरी चूक हि काळभाय्य झहालेल्या कायद्यांची आहे.
नवीन बदला नुसार जर ५१% लोक एकत् र येऊन पुनर्विकास करू शकत असती ल तर ५१% लोक अपार्टमेंट ला सो सायटी का नाही करू शकत .
मरे पर्यंत वाट बगणार का ?
Change requested in the Apartment Ownership Act
Allow home-buyers to convert Apartment to cooperative housing society with 51 % of the majority.
Make mandatory to take consent of 51% home buyers to register Apartment rather just 5 home buyers deed executors.
Verify all such cases and reconsider the judgements given by DDR's and also verify the credibility of the respective officer.
हजार हुन हि जास्त लोकांनी change.org वर स्वाक्षरी केली आहे या कायद्या विरोधात .
कित्येक वर्तमानपत्रात सुद्धा हि बातमी आली आहे तरी आपण जागे हुन हालत नाही याचमला नवल वाटते .
Shivraj Kalshitte