Petition update#Free-Up-Hinjawadi 2.0
हिंजवडी वाहतूक समस्या - मा. आमदार श्री लक्ष्मण भाऊ जगताप यांचेशी वार्तालाप

#Free-up-Hinjawadi
14 Aug 2017
Pcmc housing federation meeting with Laxman jagtap - refer message and attachment
हिंजवडी वाहतूक समस्या -
मा. आमदार श्री लक्ष्मण भाऊ जगताप यांचेशी वार्तालाप
वीज पुरवठा
आज दिनांक १३.०८.२०१७ रोजी पिंपरी चिंचवड हौसिंग फेडरेशनचे शिष्टमंडळाने आमदार श्री लक्ष्मण भाऊ जगताप यांची भेट घेऊन वाकड परिसरातील अनियमित वीज पुरवठा आणि वाढीव वीज बिले या बाबतच्या समस्यांबद्दल निवेदन दिले व प्रत्यक्षात इथ्यंभूत माहित देऊन परिस्थिती अवगत केली.
या वेळी आमदार महोदयांनी सर्व समस्यांचा लगोलग सम्यक आढावा घेऊन महावितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तत्काळ फोन वर संपर्क साधला व कोणत्या समस्येचे कसे निराकरण करता येईल या बाबत चर्चा केली. अधिकारी वर्गाने सकारात्मक भूमिका घेऊन वीज पुरवठा समस्यांचे निराकरणासाठी युद्ध पातळीवर काम चालू असल्याचे सूचित करून या समस्यांचे निराकरण येत्या आठ दिवसात निश्चित होईल असे आश्वासन दिले. या वर आमदार महोदय यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विनंती केली की वाकड मधील रहिवाशांना या समस्या घेऊन पुन्हा माझ्याकडे यावे लागणार नाही अशा पद्द्ध्तीने आपण कार्यरत व्हावे. या साठी जिथे कर्मचारी वर्ग कमी असेल तिथे तत्काळ अनुभवी कर्मचारी नियुक्त करून संपूर्ण यंत्रणा गतिमान करावी.
वाढीव वीज बिल आकारणी बाबत आढावा घेऊन मिटर रिडिंग आउटसोर्सिंग यंत्रणेच्या कामाबाबत दक्ष राहणेस त्यांनी सूचित केले. ज्या यंत्रणा सुव्यवस्थित काम करीत नसतील त्यांना बदलून त्यांचे जागी कार्यक्षम यंत्रणा नियुक्त करण्याची विनंती केली. या बाबत स्थानिक नगरसेवक यांनी देखील दक्ष राहण्याची अपेक्षा व्यक्त केली.
ही भेट आयोजित करणे बाबत प्रभाग २६ चे नगरसेवक श्री तुषार कामठे आणि माजी नगरसेवक श्री विनायक गायकवाड यांनी पुढाकार घेतला. तसेच विद्यमान श्री नगरसेवक श्री संदीप कस्पटे देखील या प्रसंगी उपस्थित राहिले.
हिंजवडी-वाकड परिसरातील वाहतूक कोंडी :
उपरोक्त समस्येवर मात करणेचे उद्देशाने ‘फ्री-अप हिंजवडी’ मोहिमेचे जनक श्री सुधीर देशमुख आणि त्यांचे सहकारी यांचेशी सविस्तर चर्चा केली. ही समस्या गंभीर असून त्या बाबत कोणती दीर्घ कालीन योजना आणि कोणती तात्कालिक योजना राबविता येईल याचा अभ्यास करणे गरजेचे आहे असे मत आमदार महोदयांनी व्यक्त केले. नवीन रस्ते तयार करणे किंवा आहे ते रस्ते रुंद करणे या बाबत भूसंपादनात अडथळे येत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
तात्कालिक योजने बाबत त्यांनी पुढील उपाय सुचविले :
Ø पिक अवर्स मध्ये नवीन बसेस वेगवेगळ्या पोइंट पासून सुरु करणे.
o उदा. वाकड परिसर, रहाटणी परिसर, पिंपळे सौदागर परिसर ई.
o या बसेस प्राधान्यत: वातानुकुलीत देण्याचा प्रयत्न असेल.
o या बसेस साठी बी.आर.टी. च्या धरतीवर पीक अवर्स मध्ये स्वतंत्र मार्ग निश्चित करण्यात येऊन पोइंट- टू- पोइंट विनाथांबा सेवा देण्याची व्यवस्था करण्यात येईल.
o त्यासाठी पिक अवर्से मध्ये एकेरी वाहतूक असेल
o मात्र या योजनेच्या यशस्वीते साठी सर्व आय टी इंजीनिअर्सनी स्वत: च्या वाहनाचा वापर करणे ऐवजी या बस चा अनिवार्यत: वापर करणे अपेक्षित आहे.
o असे केल्यास सुरुवातीच्या स्थानकापासून ऑफिस पर्यंत जाण्यास कर्मचार्यांना अवघा पंधरा मिनिटांचा वेळ लागेल.
Ø श्री सुधीर देशमुख यांनी या वेळी असे निदर्शनास आणून दिले की, प्रायव्हेट बसेस मोठ्या प्रमाणात रस्त्यावरच पार्किंग करीत असल्याने वाहतुकीस अडथळा येतो.
o या पार्श्वभूमीवर (सशुल्क) पार्किंग साठी या परिसरातील जकात नाक्याची जागा मिळू शकेल का यांची चाचपणी करण्यात यावी असे मत श्री विनय गायकवाड यांनी व्यक्त केले. तसे केल्यास वाहतूक कोंडीचा ताण कमी होऊ शकेल.
Ø सर्व मोठ्या कंपन्यांच्या व्यवस्थापनाने आपापसात समन्वय साधून आपल्या कामाच्या वेळात अर्ध्या अर्ध्या तासाचे अंतर ठेवल्यास एकाच वेळी होणारी वहातुक कोंडी विभाजित होऊ शकेल असेही मत आमदार महोदयांनी व्यक्त केले.
Ø या पार्श्वभूमीवर आय. टी. कर्मचार्यांनी या समस्येवर तोडगा काढणे साठी काय करता येईल या बाबत सक्रीय राहून अहवाल सदर केल्यास त्याच अभ्यास केला जाईल असेही त्यांनी आश्वस्त केले.
Ø श्री सुधीर देशमुख व श्री सचिन लोंढे यांनी दीर्घ कालीन उपाय आणि तात्कालिक उपाय या बाबत अहवाल आम्ही अवश्य सदर करू असे आमदार महोदयांना आश्वासित केले.
आमदार महोदयांच्या सकारात्मक प्रतिसादा मुळे सर्व वाकडवासीयांच्या आशा पल्लवित झाल्याचे दिसून आले.
Support now
Sign this petition
Copy link
WhatsApp
Facebook
Nextdoor
Email
X