1200 कोटींचा घोटाळा करणाऱ्या TWJ (Trade With Jazz) कंपनीवर तातडीने कठोर कारवाई व्हावी.

485

Let’s get to 500 signatures!
Petitions with 1,000+ supporters are 5x more likely to win!
Recent signers:
Sonali and 19 others have signed recently.

The Issue

याचिका:1200 कोटींचा घोटाळा करणाऱ्या TWJ (Trade With Jazz) कंपनीवर तातडीने कठोर कारवाई व्हावी आणि आमचे पैसे परत मिळणे बाबत

प्रति,
मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब
मुख्यमंत्री व गृहमंत्री आणि
गृह विभाग महाराष्ट्र राज्य

 

आम्ही, TWJ (Trade With Jazz) आर्थिक फसवणुकीचे पीडित गुंतवणूकदार, खालील मुद्दे आपल्याकडे निदर्शनास आणून देत आहोत:

1. TWJ ने 1100 कोटींचा घोटाळा करून आर्थिक गुंतवणुकीच्या नावाखाली 10 हजार लोकांची फसवणूक केली आहे.

2. समीर नार्वेकर, नेहा नार्वेकर, TWJ चे सर्व संचालक, तसेच संबंधित आरएम/बीएम यांच्याविरुद्ध FIR दाखल करण्यात आली आहे.अनेक गुंतवणूकदारांकडे सर्व पुरावे उपलब्ध असून सुद्धा आणि कंप्लेंट आणि एफआयआर करून सुद्धा अजून मुख्य आरोपींना अटक झालेली नाही. काही आरोपींना अटक झाली पण त्यांना लगेच बेल दिली गेली आहे.

आमच्या अधिकृत मागण्या पुढीलप्रमाणे:

  1.  गृह विभाग महाराष्ट्र राज्य विभागाकडून योग्य ती कायदेशीर कारवाई, चौकशी आणि संबंधित सर्व आरोपींना तात्काळ अटक व कठोर कारवाई करावी.
  2. प्रकरणाचा तपास SIT कडे हस्तांतरित करावा.
  3. सर्व आरोपींच्या बँक खात्यांवर व मालमत्तांवर तात्काळ जप्तीची कार्यवाही करावी.
  4. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची संपूर्ण रक्कम परत मिळवून देण्यासंबंधी प्रक्रिया सुरू करावी.

ही विनंती सार्वजनिक हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून, नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक आहे.

आपण तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, ही नम्र विनंती.

avatar of the starter
Anonymous UserPetition Starter

Petition Updates