मुंबईचे पर्यावरण धोक्यात !

0 व्यक्ति ने साइन किए। 10,00,000 हस्ताक्षर जुटाएं!


स्वप्नांची नगरी मुंबई तशी खूप श्रीमंत आहे पण मोकळ्या जागा ,उद्यान ,झाडं याबाबतीत दिवसेंदिवस दरिद्री होत चालली आहे .या काँक्रीट च्या जंगलात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरे जंगल हेच थोडासा दिलासा देणारे आहेत .मुंबईच्या तापमानवाढीस आणि तुंबणाऱ्या पाण्यास इथल्या कमी होत जाणाऱया मोकळया जागा आणि संपणारी झाडं जबाबदार आहेत .

आरे चे जंगल अश्याच प्रकारे व्यावसायिक वापरासाठी मोकळे केले असून तिथे आता मेट्रो 3 ची कारशेड बनणार आहे . जंगलात बनत असलेल्या या कारशेड आणि मेट्रो साठी जपान च्या JICA या कंपनी कडून जवळपास 2036 मिलियन डॉलर इतकी रक्कम अर्थसहाय्य म्हणून मिळणार आहे .

JICA

मित्रांनो जागतिक तापमान वाढी मूळे भोगावे लागणारे परिणाम आपण सर्वच जाणतो अशावेळी पर्यायी जागा निवडणे हे सरकारचे प्रथम कर्तव्य आहे .वेगवेगळ्या तज्ज्ञांनी 6 पर्यायी जागा सुचवल्या आहेत आणि हे ही नमूद केले आहे की आरे च्या जंगलाला काही झाल्यास मुंबईला मोठी किंमत चुकवावी लागेल.

सरकारी कागद पत्रानुसार आरे हा राष्ट्रीय उद्यानाचा अभिन्न भाग आहे ज्यात 5 लाखाहून जास्त झाडे, जिवंत प्राणी आणि आदिवासी आहेत .

आरे वाचवा या मोहिमे अंतर्गत आम्ही एवढंच सांगू इच्छितो की आमचा विरोध मेट्रोला नसून आम्ही संतुलित विकासाची मागणी करतो . हे कारशेड जंगलाच्या बाहेर नेल्याने मेट्रोला काहीही नुकसान होणार नाही पण जंगलात केल्यास जंगलाचे आणि पर्यायाने निसर्गाचे अतोनात नुकसान होईल. असे असताना सुद्धा राज्य सरकार कारशेड आमच्यावर थोपवू पाहत आहे .

आपले उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी राज्य सरकार ने JICA ला संपूर्ण खोटी माहिती पुरवली .मुंबई शहराच्या फुफुसांचे काम आरे मधले सदाहरित वृक्ष करत आहेत . या जंगलात जवळपास 76 पक्षांच्या प्रजाती,34 जंगली फुलांच्या प्रजाती,46 सरपटणाऱ्या प्राणांच्या प्रजाती, 80 फुलपाखरांच्या प्रजाती, शिवाय सस्तन प्राण्यांच्या 16 प्रजाती याचसोबत अतिशय दुर्मिळ असा बिबट्या यांचा अधिवास आहे आणि यांचे तज्ञ अहवाल या आधीच सादर झाले आहेत . शिवाय मेट्रो शेड साठी नियुक्त केलेल्या समितीने या आधी पर्याय म्हणून इतर 6 जागांची सूचना देखील केली आहे. पण हे सर्व नाकारून सरकारने कुठल्याही प्राण्यास धोका नाही आणि कारशेड ची जागा जंगल नाही व ते शहराचा एक भाग आहे असे नमूद केले.

या याचिकेवर हस्ताक्षर करून आपण JICA ला अशी मागणी करताय कि मेट्रोच्या दिल्या जाणाऱ्या भांडवलाचा (आर्थिक मदतीचा ) पुनर्विचार केला जावा. JICA च्या पर्यावरणीय आणि सामाजिक मापदंडाच्या अनेक नियमांचे उल्लंघन यात केले जात आहे. या मेट्रोकार शेडसाठी वेगळी जागा मिळेल पण मुंबईचाचा हा हरित पट्टा पुन्हा मिळणार नाही आणि आम्ही आशा करतो की JICA यावर योग्य ती कारवाई करून सदर प्रोजेक्टला स्थगिती देतील.