डॉल्बी मुक्त उत्सव
डॉल्बी मुक्त उत्सव
The Issue
प्रति
मा. जिल्हाधिकारी
सातारा जिल्हा
सातारा
महोदय
कर्ण कर्कश्य डॉल्बी हा आपल्या परंपरागत सण समारंभांना लागलेला शाप आहे. समारंभात डॉल्बी वाजवावो असे कोणत्याही धार्मिक ग्रंथात लिहिलेले नाही. डॉल्बी चा श्रद्धेशी किंवा संस्कृतीशी काही एक संबंध नाही.डॉल्बी ही एक विकृती आहे.
डॉल्बी च्या कर्कश आवाजा मुळे नागरिकाना फार त्रास होतो. सामान्य लोकांना कानाचे विकार जडतात. लहान मुले, वृध्द आणि रुग्ण ह्यांना जो त्रास होती तो कल्पनेच्या पलीकडे आहे. वाई शहरात तर रुग्णालयांच्या अत्यवस्थ रुग्ण विभागा समोर सुद्धा डॉल्बी वाजविली जाते.
ह्या पुढे वाई तालुक्यात सर्व सण समारंभ कायद्याच्या चौकटीत राहून, डॉल्बी विरहित साजरे केले जावेत. ह्याची सुरवात आगामी गणेश उत्सवा पासून करावी. त्या साठी आपण आवश्यक ती कारवाई करावी.
वाई तालुक्यातील नागरिकांच्या स्वास्थ्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्या दृष्टीने योग्य ते आदेश निर्गमित करावे ही विनंती.
आपले विनीत
वाई तालुक्या तील सुजाण डॉल्बी पीडित नागरिक
791

Petition Updates
Share this petition
Petition created on 17 August 2025