Petition updateSave Navi Mumbai Wetlands Save Yourselves .#Run4Flamingos : एक धाव फ्लेमिंगोंसाठी
SaveNaviMumbai Wetlandsnavi Mumbai, India
Feb 4, 2019

नवी मुंबईच्या खाडी परिसरात असणाऱ्या खारफुटीच्या वनांचं संरक्षण करण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या मॅरेथॉनमध्ये महिला आणि पुरुष अशा दोन गटांमध्ये जवळपास एक हजारहून अधिकजणांचा सहभाग पाहायला मिळाला.
धकाधकीच्या आणि व्यग्र दैनंदिन आयुष्यात वेळ काढत निसर्गाच्या काही देणग्या जपण्यासाठी म्हणून नवी मुंबई महानगरपालिका, वंडरिंग सोल्स आणि आणि Save Navi Mumbai Environment group यांच्या संयुक्त विद्यमाने एका मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं.
सीवूड्स येथून या मॅरेथॉनला सुरुवात झाली. रविवारी, सुट्टीच्या दिवशी शहरालाही जाग येण्यापूर्वी एका खास कारणासाठी हे सर्व धावपटू एकत्र जमले होते.
ज्या कारणासाठी ते एकत्र आले होते ते म्हणजे फ्लेमिंगो या पक्ष्यांच्या प्रजातीचं संरक्षण आणि खारफुटी वनांचं संवर्धन.
नवी मुंबईच्या खाडी परिसरात असणाऱ्या खारफुटीच्या वनांचं संरक्षण करण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या मॅरेथॉनमध्ये महिला आणि पुरुष अशा दोन गटांमध्ये जवळपास एक हजारहून अधिकजणांचा सहभाग पाहायला मिळाला.
चौदा वर्षांच्या बच्चेकंपनीपासून ते पन्नाशी ओलांडलेल्या उत्साही स्पर्धकांपर्यंत अनेकांचाच उत्साह यावेळी सर्वांमध्ये पाहायला मिळाला.
ज्या कारणासाठी हे पाऊल त्यांनी उचललं होतं, ही धाव घेतली होती, त्याचा आनंद प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
तरुणाईचा उत्साह, समाज आणि पर्यावरणाप्रती असणारी जबाबदारी आणि त्यासाठी उचलण्यात आलेलं सकारात्मक पाऊल या साऱ्यामुळे ही फ्लेमिंगोंसाठीतची धाव एक नवा पायंडा पाडणारी ठरली आहे असंच म्हणावं लागेल.
.... तर अशी होती ही फ्लेमिंगोंसाठीची धाव .

Wandering Souls Run for Flamingos - Save Mangroves, save Wetlands.

#run4flamingos #keepWetlands #dial1926
https://zeenews.india.com/marathi/photos/marathon-run-held-at-navi-mumbai-by-wandering-souls-initiative-to-create-awareness-about-importance-of-mangroves-wetlands-and-flamingos/460739

Copy link
WhatsApp
Facebook
Nextdoor
Email
X