वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे - nanar refinery हटवा .. नसर्ग वाचावा ..

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे - nanar refinery हटवा .. नसर्ग वाचावा ..

0 व्यक्ति ने साइन किए। 500 हस्ताक्षर जुटाएं!
500 साइन के बाद इस पेटीशन को लोकप्रिय पेटीशनों में फीचर किए जाने की संभावना बढ़ सकेगी!

sushil chavan ने DEVENDRA FADNAVIS को संबोधित करके ये पेटीशन शुरू किया

मुंबईतील निसर्गाची हानी करून मुंबईचा पार बट्याबोळ करून झालाय .. आता कोकणात वळले आहेत .. महाराष्ट्राचं वैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकणचा निसर्ग हळू हळू लोप पावत चाललाय .. वेळीच लक्ष नाही दिले तर मुंबई सारखा आपला कोकणही भकास होऊन जाईल आणि आता राजा सारखा जगणारा आपला कोकणी माणूस फक्त चाकरी करण्या पुरता उरेल .. आपला निसर्ग आपली जागा म्हणजे आपली शान आणि आपलं अस्तित्व आहे .. डेव्हलपमेंट म्हणजे नक्की काय .. मोठं मोठ्या बिल्डींग्स, कारखाने म्हणजे डेव्हलपमेंट नाही हे आमच्या मुख्यमंत्र्या न पर्यंत आपण पोहोचवलं पाहिजे .. त्या गावात रस्ते पाणी आणि इतर आवश्यक गोष्टींची सोय उपलब्ध करून देणे .. उच्च शिक्षण आणि उत्तम दवाखान्याची सोय करणे तसेच तिथे जे उपलब्ध आहे त्यातून रोजगार निर्माण करण्याची व्यवस्था करणे (ex : आंबे, काजूच्या उत्पादनाचा, मासेमारी, पर्यटन असं बरंच काही) .. ह्यालाही डेव्हलपमेंट म्हणता येईल .. निसर्ग टिकवून केलेली डेव्हलोपमेंट ..
मुख्यमंत्री साहेब मी माझ्या सारख्या मुंबईत राहणाऱ्या सामान्य माणसापासून ते असंख्य कोकण वासियांची आपणास विनन्ति आहे कि नाणार प्रकल्प रद्द करा आणि पुन्हा आमच्या स्वर्गातील निसर्ग लोप पावेल असे प्रकल्प आणू नका ..
माझी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला विनन्ति आहे कि कृपया तुमचा विरोध इथे दर्शवा .. हा लढा फक्त नाणार वासियांचा नाही संपूर्ण महाराष्ट्राचा आहे ..

एक निसर्ग प्रेमी ..

0 व्यक्ति ने साइन किए। 500 हस्ताक्षर जुटाएं!
500 साइन के बाद इस पेटीशन को लोकप्रिय पेटीशनों में फीचर किए जाने की संभावना बढ़ सकेगी!