Give our Monthly Salary on TIME

Give our Monthly Salary on TIME

34 लोगों ने साइन किए। 50 हस्ताक्षर जुटाएं!
50 साइन के बाद इस पेटीशन को लोकप्रिय पेटीशनों में फीचर किए जाने की संभावना बढ़ सकेगी!
आरोग्य कर्मचारी ने Public health department, government of Maharashtra और को संबोधित करके ये पेटीशन शुरू किया

कोरोना व्हायरस ची पहिली लाट आली तेव्हापासून ते आज तीसरी लाट आपल्या दारावर येऊन थांबली असून, आरोग्य कर्मचारी आपला व आपल्या कुटुंबीयांचे जीव मुठीत घेऊन या व्हायरस पासून महाराष्ट्राच्या जनतेसाठी लढत आहे. कुठल्या ही प्रकारच्या आर्थिक किंवा जातीय भेदभाव न करता आम्ही दिवस रात्र या जनतेच्या आरोग्य संरक्षण करत आहोत.

पण प्रत्येक महिन्यात अनुदान उपलब्ध नसल्याचे सांगून आमच्या हक्काचा पगार आम्हाला वेळेवर या सरकार कडून दिला जात नाही आहे. 

सरकारी कर्मचारी सुद्धा एक माणूस असून त्याला एक कुटुंब असतो, वयस्कर आई वडील असतात, भाऊ - बहीण असतात, लहान मुले असतात, पत्नी असते. या सर्वांची आरोग्याची जबाबदारी, शाळेच्या फी ची जबाबदारी, खान - पान ची जबाबदारी, दळण वळण ची जबाबदारी ही आमच्यावर असून, पगार वेळेवर न झाल्यास ती आम्ही पूर्ण करायची तरी कशी?

याच्या पलीकडे गृह कर्ज हप्ता, विमा हप्ता, मोटार वाहन कर्ज हप्ता हे ही वेळेवर भरले जात नाही. या मुळे ECS/ cheque बाऊन्स चार्जेस, अधिक व्याज, आणि late फी चा आर्थिक भुर्दंड तर आमच्या खिष्यावर येतोच पण आमचा CIBIL स्कोर सुध्दा या उशिरा होणाऱ्या पगारामुळे खराब होतो.

तरी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग, मा. आरोग्य मंत्री श्री. राजेश टोपे, मा. अर्थमंत्री श्री. अजित पवार, व मा. मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे यांनी आरोग विभाग कर्मचारी यांचे वेतन १-५ तरखेदर्मयान सक्तीने करण्यात यावे यासाठी लवकरात लवकर पाऊल उचलावे ही अपेक्षा.

- महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग कर्मचारी.

34 लोगों ने साइन किए। 50 हस्ताक्षर जुटाएं!
50 साइन के बाद इस पेटीशन को लोकप्रिय पेटीशनों में फीचर किए जाने की संभावना बढ़ सकेगी!