Treat 100% Sewage of Pune city on war-footing to avoid public health emergency

Treat 100% Sewage of Pune city on war-footing to avoid public health emergency

Started
20 January 2018
Petition to
Mayor Murlidhar Mohol (Mayor of Pune City) and 2 others
Signatures: 5,710Next Goal: 7,500
Support now

Why this petition matters

Started by Manish Ghorpade

Recent findings of research done about microbes found in Mula-Mutha rivers are shockingly alarming and need immediate action on war-footing by PMC.

According to this research, the diseases caused by microbes found in Mula-Mutha rivers will be untreatable as these microbes do not respond to even the strongest of antibiotics available. This is a serious health hazard for all the citizens of Pune city and has to be dealt with on top priority.

Major cause of this is untreated sewage getting dumped directly in the rivers everyday for years together. It is a known fact that there is inadequate capacity of sewage treatment in the city (installed capacity is only @70%max). So there is urgent need to divert all resources to bridge this gap first instead of spending PMC budget on cosmetic beautification of the city.

Also, the track record of performance of existing sewage treatment plants is extremely shady and has been pointed out time and again by various environmental experts and NGOs. Even basic essential facilities like power back up are not available in existing plants which makes plant ineffective in case of power outages.

Because of this, the 'Life Nurturing' rivers of Pune have become 'Life Threatening' drainage. This has to stop immediately.The situation of public health has been steadily deteriorating over past few decades. If the situation is not controlled now it may wreck a havoc of epidemic of untreatable diseases.

Following actions are needed to be initiated urgently - 1. Audit of existing STPs by independent agency 2. Taking measures to restore effectiveness of existing STPs based on observations /recommendations 3. Installing Real time continuous monitoring systems of water quality at outlet of STPs and making data public. 4.Formation of empowered committee to fast-track installation of new STPs to achieve 100% sewage treatment in committed and time-bound manner.

http://punemirror.indiatimes.com/pune/cover-story/diseases-caused-by-mula-mutha-are-untreatable/articleshow/62449938.cms

मुळा मुठा नदीच्या पाण्यातील जीवाणू आणि विषाणू यासंबंधित अलीकडेच झालेल्या संशोधनातील निष्कर्ष अत्यंत गंभीर धोक्याची जाणीव करून देणारे आहेत. त्यामुळेच यावर महानगरपालिकेने युद्धपातळीवर त्वरित कृती करण्याची गरज आहे.

या संशोधनातील निष्कर्षानुसार मुळा मुठा नदीच्या पाण्यातील धोकादायक सूक्ष्मजंतू हे कोणत्याही प्रजैविकांनाही (Anti-Biotics) दाद देत नाहीत असे दिसून आले आहे. त्यामुळे त्यांच्यापासून होणाऱ्या आजारांवर कोणतेही औषध उपयोगी पडणार नाही. सर्व पुणेकर नागरिकांच्या दृष्टीने हि अत्यंत गंभीर बाब आहे आणि यावर त्वरित कृती होण्याची आवश्यकता आहे.

अनेक वर्षे प्रतिदिन प्रक्रिया न करता नदीत सोडले जाणारे मैलापाणी हे मूलतः या परिस्थितीला कारणीभूत आहे. शहरातील मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रांची क्षमता हि गरजेपेक्षा अत्यंत तोकडी (पाहिजे त्याच्या फक्त ६०- ७०%) आहे हि बाब अनेकदा समोर आली आहे. शहराच्या वरवरच्या दिखाऊ सुशोभीकरणासाठी होणारे खर्च टाळून प्राधान्यक्रमाने मनपाचे बजेट या मैलापाणी शुद्धीकरणाच्या प्रकल्पांवर खर्च होणे गरजेचे आहे.

सध्या अस्तित्वात असलेल्या प्रक्रिया केंद्रांचा अनुभवही काही चांगल नाही हे वास्तव या क्षेत्रातील तज्ञ आणि स्वयंसेवी संस्थांनी अनेकदा अधोरेखित केले आहे. या केंद्रांना अखंडित वीजपुरवठ्यासारखी अत्यंत मुलभूत सोयही नाही. यामुळे काही तास वीजपुरवठा खंडित झाला तर त्या दिवशी कोणतीही प्रक्रिया न करताच मैलापाणी नदीत तसेच सोडून देण्याशिवाय पर्याय नसतो.

या परिस्थितीमुळे पुण्याच्या ‘जीवनदायिनी’ असलेल्या नद्या या पुणेकरांसाठी अत्यंत धोकादायक नाले बनल्या आहेत. हे तातडीने थांवण्याची गरज आहे. गेल्या ३-४ दशकांमध्ये पुण्यातील सार्वजनिक आरोग्य अधिकाधिक ढासळत गेलेलं दिसत आहे. या परिस्थितीवर आता नियंत्रण आणले नाही तर आपल्या शहरात असाध्य रोगांच्या साथीचे थैमान येऊ शकते!

हि परिस्थिती टाळण्यासाठी खालील कृती त्वरेने घडणे अत्यावश्यक आहे-

१.       सध्याच्या प्रक्रिया केंद्रांचे निष्पक्ष तज्ञांकडून परीक्षण करून घेणे

२. या परीक्षणातील निरीक्षणे आणि निष्कर्षांवर आधारित त्यांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे

३. या केंद्रांमधून प्रक्रिया होऊन बाहेर पडणाऱ्या पाण्याची गुणवत्ता तपासणारी आणि देखरेख करणारी स्वयंचलित यंत्रणा राबवणे आणि हि माहिती नागरिकांना खुली करणे.

४. १००% मैलापाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी नवीन प्रक्रिया केंद्रे उभारण्याची योजना कालबद्ध पद्धतीने पूर्ण होण्यासाठी उच्चस्तरीय आणि निर्णयक्षम समितीची स्थापना करणे.

http://punemirror.indiatimes.com/pune/cover-story/diseases-caused-by-mula-mutha-are-untreatable/articleshow/62449938.cms

 

Support now
Signatures: 5,710Next Goal: 7,500
Support now

Decision Makers

  • Mayor Murlidhar MoholMayor of Pune City
  • Mr. Saurabh RaoMunicipal Commissioner, Pune
  • Mr Shravan Hardikar, PCMC CommissionerCommissioner PCMC