Petition Closed

14 year punishment and nonmailable warrant for person's assaulting doctors

This petition had 17 supporters


Save doctorसंवेदनाहीन समाजाचं..संवेदनाहीन सरकार ..

संवेदनाहीन मंत्री..आणि 

धमकी ची भाषा बोलणारे मुख्यमंत्री..

आणि आता शेवटी बाकी होते ते अतिकार्यक्षम कोर्ट 

काम करायचे नसेल तर घरी बसा सांगून जखमेवर मीठ चोळणारं .. 

    डॉक्टर मित्रांनो आता असे वाटु लागलंय कि आपण या समाजात मंगळावरून आलेलो परग्रहीय प्राणी आहोत.. ज्या समाजासाठी आयुष्यं घालवायचं ,वरून निवृत्त नं होता मरेपर्यंत काम करायचं .. 

बायको पोरांचे हक्काचे दिवस,वेळ रुग्णांना द्यायचा ..  तरुणपण अभ्यासत घालवायचे ..दहा वर्ष अहोरात्र मेहनत करून  डिग्री घेऊन चार पैसे कमवायला लागलो कि मग ज्यांच्या साठी हि ज्ञानसाधना केली त्यांच्या शिव्या खायच्या आणि कधीही मार खायची तयारी ठेवायची .. 

मित्रांनो जगात कुठली अशी डिग्री आहे जी तुमचा जीव धोक्यात घालायला भाग पाडते..कुठले व्यवसाय आहे ज्यात मार आणि शिव्या दोनी खाव्या लागतात ते पण ज्यांचा जिवाचवायचा आहे त्यांच्याकडून ..काय हा दुर्दैवं विलास.. आज hippocratos जिवंत असता ना तर बोलला असता बाबांनो मी तुमाला शप्पथ देणार नाही मार खायची आणि मरायची सुद्धा .. आणि धाय मोकलून रडला असता ढसाढसा .. 

AC केबिन मध्ये बसून newsroom मध्ये चर्चा करणारे आम्हाला आमच्या शपथेची आठवण करून देतात ,स्वतःची पत्रकारितेची नीतिमत्ता विकून कंबरेला बांधणारे ,राजकारण्यांचा जयजयकार करून त्यांचे तळवे चाटणारे आम्हला काय नीतिमत्ता शिकवणार ..ब्रेकिंग news ची competion करणारें news वाले ज्यांची विश्वासार्हता विकल्या गेलीय ते आम्हाला सांगणार आमचे कर्तव्य .. वा रे वा काय समाज आहे.. 

राजकारण्याबद्दल तर बोलायलाच नको आजकाल ,उगीच देशद्रोहाचा खटला भरून तुरुंगात टाकायचे..जगाच्या पाठीवर सगळ्यात निर्लज्ज आणि खोटारडी हि एकमेव जमात भारतात आहे.. म्हणे संप मागे घ्या नाहीतर हे करू ते करू .. अरे कुणाला धमक्या देताय जो रोज मरतोय मार खातोय त्याला ..  तुमाला वाटतंय दुर्बल आहे ,डॉक्टर चं आहेत ना काय वाकडे करणार आमचे,वाकडे करायला वोट बँक कुठेआहे तुमची आम्ही ,नाहीतर पाठी पळत आला असता election अलं की भीक मागायला..इतकी वर्ष सगळेच सत्तेवर येऊन गेलात ना आलटून पालटून मस्त मलिदा खाताय न AC मध्ये बसुन का नाही आत्तापर्यंत सुरक्षा पुरवली तुम्ही सांगा ना ..आता ऊर बडवून सांगताय १५ दिवसात सगळे करू ..मग इतकी वर्ष तुमचे हात कुणी बांधले होते ,कि तुम्ही ठरवलंय एखाद्या डॉक्टरचा जीव गेल्याशिवाय काही करायचे नाही ..3000 शेतकरी एका वर्षात आत्महत्या करतात त्याचं तुमाला काही सोयरसुतक नाही.. डॉक्टर मेला तर तुमाला काय फरक पडणार म्हणा 

बघा ना मित्रांनो एक तरी राजकीय पक्ष आला का तुमच्या मदतीला..वाघ ,सिंह ,शेळी ,मांजर ,बाण ,पंजा घड्याळ सगळे कसे शांत बसलेत धृतराष्ट्रासारखे आंधळे होऊन.. इतकी वर्ष झाली स्वतंत्र मिळून आपल्याला सार्वजनिक आरोग्य व्यवस्था नीट देऊ शकले नाहीत हे सगळे,सर

कारी हॉस्पिटल मध्ये डॉक्टर नाहीत  पुरेसे ,औषधें नाहीत पुरेसे ,नर्सिंग स्टाफ नाही पुरेसा कोण जबाबदार आहे सांगा ना सगळ्याच बहाद्दरांनो..का नाही कायदे केले सुरक्षेचे ,केले ते कागदावर ,पोलीस लाच माहित नसतो ..किती  strike जाले आतापर्यंत मग दर वेळी तेच आश्वासन देता निर्लाज्जासारखे आणि पुन्हा डॉक्टर मार खातो पुन्हा तुम्ही तेच आश्वासन देता ते हि धादांत खोटे..2006 मध्ये १३ दिवसांचा संप झाला तेंव्हाही हीच आश्वासने ह्याच मागण्या ,कसला हा निर्लज्जपणा आणि निगरघट्टपणा तुमची मर्दुमकी फक्त निवडणुका लागल्या कि दिसते ,एरव्ही तुम्हाला त्याचे काही देणे घेणे नाही ..जगणारा जगतो आणि मरनारा मरतो ..जीव वाचवायचा प्रयन्त डॉक्टरांनी करायचा हां फक्त ,ते हि समाजाने कानफाटला पिस्तूल लावले तरी ,काय करणार आम्ही शपथ घेतली ना जीव वाचवायची मग गोळी घातली तरी चालेल.. 

 मला या double standard च्या समाजाला काही प्रश्ने विचारायचे आहेत.. रेल्वेअपघातात आतापर्यंत हजारो लोके मेली कधी रेल्वे च्या इंजिनीरला  किंवा रेल्वे मंत्रयांना मारलात का ..?खराब रस्त्यसमुळे शेकडो अपघात होतात कधी कॉन्ट्रॅक्टर ला किंवा तुमच्या भागातल्या लोकप्रतिनिधीला मारलात का..साधा प्रश्न विचारण्याची हिंमत आहे का ?तुम्हला आरोग्य सुविधा मिळत नाहीत म्हणून आरोग्य मंत्रयांना कधी जाब विचारलात का ?नाही ना कारण हा समाज भित्रा आहे पळपुटा आहे ,मग मारणार कुणाला जो निशस्त्र आहे ..जो शांत आहे ,एकटा आहे ,काही वाकडे करणारा नाही ,शिव्या दिल्या तरी हसून ऐकणारा आहे मग काय ठोका सगळ्यांचा राग बिचाऱ्या डॉक्टर वर काढा.. आत्ताच एक महाभाग बोलला फेसबुक वर याना रोज ठोकले पाहिजे ,ये बाबा ठोक सगळ्यांना आणि मग तुज्या घरच्यांना ट्रीटमेंट द्यायला ,समाजातल्या आजारी रुग्णांना उपचार करायला पाकिस्तानातूनच डॉक्टर बोलाव म्हणजे झाले ,आम्ही तरी सुटू एकदाचे .. 

म्हणे डॉक्टर पैसे घेतात ,आता मोदींच्या डिजिटल इंडियात पैसे नाही तर काय धान्य देता का आम्हाला खायला.. सेवा करायचा ठेका काय आम्हीच घेतलाय का,बाकी सगळ्या धंदेवाले मेवा खातात मलिदा खातात त्यांना का नाही विचारत ,बिल्डर ,सरकारी अधिकारी ,राजकारणी ,वकील आय टी वाले सगळे रग्गड कमावणार आणि आम्ही आमच्या मेहनतीचे चार पैसे मागितले कि  आम्ही लुटारू ठरणार ,आम्ही जेंव्हा फी मागतो ना तेंव्हा आमचे अर्धे आयुष्य  गेलेलं असते राव त्या मेडिकल च्या बुकात..दुसऱ्या कुठल्या profession ची लोके एव्हडी वर्ष शिकतात सांगा ना मग हक्काची फीस तर मागणारच ना ..आम्ही माणुसकी दाखवतो हो रोज रोज ती आमच्या रक्तात आहे डॉक्टर म्हणून पण आम्ही  साधुसंत पण नाहीत ना ,ते हि आजकाल रग्गड फीस घेतात 

 डॉक्टर मित्रांनो भविष्यात काय वाढून ठेवलंय हे माहित नाही पण काहीही झाले तरी आपण आपले सतीचं वाण घेतलाय ते सोडणार नाही हान कदाचित कामाची पद्धत बदलावी लागेल ,अजून निर्भय होऊन काम करावे लागेल ,कुणी अंगावर आला तर शिंगांवर घ्यावे लागेल..सगळेच बदलले आहेत आता आपल्याला हि बदलावे लागेल..पुन्हा संप झाला तर मग बंदुकीचे license तरी देउन टाका स्वताच जीव वाचवायला अशी मागणी करावी लागेल .. 

   जे घडतंय ते खूप मन सुन्न करणारे आहे पण आताही किती हि serious patient आला तर तेवढ्याच PASSION ने CPR  देऊन flat line चा पुन्हा PQRS कॅम्पलेक्स करून एक जीव वाचवायचा आहे.. हाच आपला शेवटच्या श्वासापर्यंतचा धर्म आहे.. 

 शेवटी एकच सांगेन.. बने चाहे दुश्मन ये सारा जमाना ,सलामत रहे दोस्ताना हमारा... doctors unity झिंदाबाद ..Today: Chetan is counting on you

Chetan Patil needs your help with “Parliment: 14 year punishment and nonmailable warrant for person's assaulting doctors”. Join Chetan and 16 supporters today.