We Citizen of Pimpri-Chinchwad against Lockdown आम्ही पिंपरी-चिंचवडकर लॉकडाउनच्या विरोधात

We Citizen of Pimpri-Chinchwad against Lockdown आम्ही पिंपरी-चिंचवडकर लॉकडाउनच्या विरोधात

0 have signed. Let’s get to 500!
At 500 signatures, this petition is more likely to be featured in recommendations!

प्रती,
माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री. उद्धव ठाकरे 

विषय : आम्ही पिंपरी-चिंचवडकर लॉकडाउनच्या विरोधात. 

# औद्योगिकनगरीला लॉकडाउन परवडणार नाही! गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या महामारीचा आपण सर्वजण सामना करीत आहोत. पिंपरी-चिंचवड ही आपली औद्योगिकनगरी, कामगारनगरी आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून कामगार याठिकाणी आले आहेत. लॉकडाउन-१ मध्ये मोठ्याप्रमाणात कामगार स्वर्गही परतले. त्यापैकी सुमारे ३० टक्के कामगार अद्याप परतलेले नाहीत. आता पुन्हा लॉकडाउनची भिती व्यक्त केल्यामुळे अनेक कामगार पुन्हा गावी जायला निघाले आहेत.

- कामगारांना बेरोजगारीची भिती.
- मार्च महिन्यात कंपन्यांचे उत्पादन घटले.
- उद्योजकांचे अर्थचक्र धोक्यात आहे.
- लघु- सुक्ष्म उद्योजकांना आर्थिक फटका
- कच्चा माल उपलब्ध होण्यास अडचणी, परिणामी उद्योगांचे नियोजन कोलमडले.

****
# व्यासायिकांचे अर्थचक्र कोलमडणार:
शहरातील हॉटेल, स्नॅक्स सेंटर, रेस्टॉरंट, हातगाडीवाले, टपरीधारक, भाजीविक्रेते आदी व्यावसायिकांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. बहुतांश व्यावसायिक भाडेकरु आहेत. गेल्या लॉकडाउनमध्ये जागा मालकांनी भाडे माफ केले नाही. हॉटेल्स, रेस्टारंटमधील कर्मचारी संख्या कमी करण्यात आली आहे. प्रशासनाच्या निर्बंधांमुळे अगोदरच व्यावसायावर परिणाम झाला आहे. त्यात पुन्हा लॉकडाउन झाल्यास शहरातील छोटे व्यावसायिक अडचणीत येणार आहेत. किंबहुना शहरातील बहुतेक हॉटेल, स्नॅक्स सेंटर चालकांनी आपले व्यावसाय बंद केले आहेत. बँक हप्ते, कामगारांचे पगार, देखभाल दुरुस्तीचा खर्च, वीज बिल आदीबाबत आर्थिक तरतुद करण्यासाठी व्यावसायिकांना कसरत करावी लागत आहे. 
या मुद्यांचा विचार करता पिंपरी-चिंचवडमधील व्यावसायिकांचा लॉकडाउन-२ ला विरोध आहे.

****
# लॉकडाउन हा उपाय नाही: 
नागरिकांनी आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेतली. तरीसुद्धा आपण कोरोनाला हद्दपार करु शकतो. लसीकरण प्रमाण वाढवले पाहिजे. नागरिकांत जनजागृती केली पाहिजे. लसीकरणासाठी शासकीय यंत्रणेचा उपायोग केल्यास अधिकाधिक नागरिकांना लसीकरण करता येईल. कोरोना चाचण्या वाढवल्या पाहिजेत. त्यावर होणारा खर्चही कमी केला पाहिजे असे असताना केवळ लॉकडाउन करणे हा उपाय होणार नाही. 

****
# पिंपरी-चिंचवडकरांचा सवाल:
पिंपरी-चिंचवडकरांचा लॉकडाउनला तीव्र विरोध आहे. त्यामुळे सरकार लॉकडाउन अनिवार्य करीत असेल, तर आम्हा पिंपरी-चिंचवडकरांचे काही सवाल आहेत. 
- सरकार आमचे वीजबिल, पाणीबील माफ करणार आहे का?
- सरकार नागरिकांचा मिळकतकर माफ करणार आहे का?
- भाडेकरु असलेल्या व्यावसायिक, घरभाडे सरकार माफ करणार का?
- हातावर पोट असलेल्या लोकांच्या जीवनाश्यक वस्तुंच्या पुरवठ्याची जबाबदारी घेणार आहे का? 
- कामगारांचे कपात झालेले वेतन कामगारांना सरकार देणार आहे का? 
- व्यावसायिकांचे झालेल्या नुकसानाची भरपाई देणार आहे का? 
- शाळांच्या फी सरकार माफ करणार आहे का? 
- बँकांचे हप्ते, त्याचे व्याज सरकार माफ करणार आहे का?
- महापालिका प्रशासनाकडे होणारी वित्तीय तूट सरकार भरुन देणार आहे का?

या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्या सरकारकडे नाहीत. किंबुहूना याबाबत काहीच चर्चा केली जात नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांना लॉकडाउन-२ नको आहे.

या ऑनलाइन स्वाक्षरी मोहिमेतून सर्वसामान्य पिंपरी चिंचवडकरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहचवण्याचा हा माझा प्रयत्न आहे, यावर आपण विचार करून योग्य निर्णय घ्यावा अशी आपणास विनंती

आपला,
महेश किसन लांडगे,
शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड.
आमदार, भोसरी विधानसभा मतदारसंघ

0 have signed. Let’s get to 500!
At 500 signatures, this petition is more likely to be featured in recommendations!