महाराष्ट्र पोलिसांना दिवाळी बोनस मिळाला पाहिजे!

महाराष्ट्र पोलिसांना दिवाळी बोनस मिळाला पाहिजे!
आदरणीय मुख्यमंत्री महोदयश्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब,महाराष्ट्र राज्य
महोदय मी आपणास नम्रपणे सांगू इच्छितो की,नुकताच रेल्वे कर्मचाऱ्यांना शासनाने 78 दिवसांचा बोनस जाहीर केला आहे,तसेच कोरोना काळात काम केलेल्या डॉक्टरांना 1.21 लाख रुपये बोनस जाहीर केला आहे! काही दिवसात महानगरपालिका कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर होईल! त्या धर्तीवर महाराष्ट्र पोलिसांना ही बोनस देण्यात यावा कारण, महाराष्ट्र पोलीस हा समाजाचा, शासनाचा अतिशय महत्त्वाचा व असंघटित त्यामुळे अतिशय दुर्लक्षित घटक आहे! समाजातल्या दुष्ट प्रवृत्ती,गुन्हेगारी, गॅंग वार,अंडरवर्ल्ड असो, आतंकवादी हमला असो, नैसर्गिक संकट असो, कोरोना महामारी सारखे संकट असो प्रत्येक वेळी माझ्या महाराष्ट्र पोलिसाने जीवाचे बलिदान देऊन या महाभयानक संकटांना रोखले आहे! तसेच महाराष्ट्र शासनाच्या महसूल वसुली प्रक्रियेतही महाराष्ट्र पोलिसांचा सिंहाचा वाटा आहे!तसेच समाजाच्या हितासाठी इतरही अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या आव्हानात्मक जबाबदाऱ्या पोलीस पार पाडत असतात! महाराष्ट्र पोलिसांचे बलिदान व अतिशय कठीण 12 तास /कधी 24तास / निवडणुकांच्या व इतर अतिमहच्या बंदोबस्त कालावधीत तर कालावधीत तर सतत चार-पाच दिवस कर्तव्याचे स्वरूप लक्षात घेऊन रेल्वे,डॉक्टर,महानगरपालिका व इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महाराष्ट्र पोलिसांकडेही मानवतेच्या दृष्टिकोनातून बघावे व महाराष्ट्र पोलिसांनाही दिवाळीत बोनस किंवा नापरतावा अग्रिम देण्यात यावा ही नम्र विनंती!
आपला नम्र
सचिन खुबीराम जयस्वाल
मो.7715974153