Help us save our school Madhya Railway Madhamik Vinyalay (also known as Indian Highschool)

Help us save our school Madhya Railway Madhamik Vinyalay (also known as Indian Highschool)

0 have signed. Let’s get to 100!
At 100 signatures, this petition is more likely to be featured in recommendations!
Chhaya Muralkar started this petition to Narendra Modi (PM of India) and

Our school was built on land leased by Indian Railways 100 years back. Lease of land expires this year and school has been given notice to vacate. Request Narendra Modi ji and his government to renew land lease and save our school which has helped millions of students in Manmad and nearby towns! 

 

About school

*मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक (शास्त्र ) विद्यालय मनमाडचा ९६वा वर्धापनदिन*
Il इवलेसे रोप लावियले दारी
तयाचा वेलू गेला गगनावरी ll
दि. ३ जुलै १९२२ रोजी मनमाड सारख्या कामगार वस्तीच्या गावात तत्कालीन रेल्वे अधिकारी कै. रावसाहेब तथा डी. एस.सप्रे ह्यानी आपल्या इतर ,५ सहकाऱ्यांच्या मदतीने राष्ट्रीय शिक्षण संस्थेची स्थापना केली .
दुसरे महायुद्ध संपल्यानंतर ब्रिटीश सरकारने आपले शिक्षण विषयक धोरण बदलले ह्या मुळे भारतात शाळा काढण्यास सरकार प्रोत्साहन देवू लागले होते.नेमकी हीच संधी ओळखून मनमाड मधे रेल्वे प्रशासनाच्या मदतीने आपल्या शाळेची स्थापना झाली. दूरदर्शी व शिक्षण प्रेमी असणाऱ्या ब्रिटीश रेल्वे प्रशासनाने शाळेला सर्वोतोपरी सहकार्य केले आगदी रेल्वेच्या बंद झालेल्या शाळेतील बेंचेस व इतर साहित्य देखील त्यांनी देवू केले.
रावसाहेब सप्रे हे फक्त शिक्षण प्रेमीच नव्हते तर स्वतः उच्च विद्या विभूषित होते ते मुंबईतील नामाकित अशा "विक्टोरिया जुबिली" टेक्निकल संस्थेच्या (संस्थेचे सद्ध्याचे नाव विरजिजामाता टेक्निकल संस्था )पहिल्या ब्याचचे विद्यार्थी होते . मनमाड ते मुंबई दरम्यानच्या सर्व रेल्वे पुलांचे नकाशे त्यांनी तयार केले होते त्यांच्या कामाची दखल घेवून त्यांना "रावसाहेब " ही उपाधी बहाल करण्यात आली होती.
लो. टिळकांनी सांगितलेल्या चतुसुत्रितील कलमानुसार राष्ट्रीय शिक्षण देण्याची गरज ओळखून संस्थेचे नाव राष्ट्रीय शिक्षण संस्था असे ठेवण्यात आले ही बाब संस्थाचालकांची दूरदृष्टी दर्शविते
९६ वर्षाच्या ह्या प्रवासात शाळेने अनेक कठीण प्रसंगावर मात करून मनमाडच्या नावलोकिकात भर पाडली आहे स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक विद्यार्थी ह्या संग्रामात सहभागी झाले होते तर दुसरीकडे स्वातंत्र्योत्तर नवनिर्मानात देखील अनेक विद्यार्थ्यांसह शिक्षक देखील सहभागी झाले होते .मनमाड मधील "ऑक्सफर्ड" अशी ह्या शाळेची ओळख होती.
सुरुवातीस माध्यमिक शाळा असणाऱ्या ह्या विद्यालयाने गरज ओळखून उच्च माध्यमिक विभाग सुरू केले व त्यात शास्त्र आणि वाणिज्य शाखा सुरू केल्या पण सरकारी अनास्थेमुळे वाणिज्य विभाग बंद झाला . रेल्वे प्रशासन चालवत असलेल्या इंग्रजी माध्यमातील १ ते ७ वी पर्यंत शिक्षण घेतलेली विद्यार्थ्याच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून शाळेने इंग्रजी माध्यमाचे ई ८,९,१० हे वर्ग सुरू केले सरकारी अनुदान असणारी ही जिल्ह्यातील एकमेव इंग्रजी शाळा आहे . पुढे जावून संस्थेने आपला प्राथमिक विभाग सुरू केला आजमितीस सुमारे १५००विद्यार्थी शिक्षण घेत आहेत
शाळेच्या आजवरच्या प्रवासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींचा उल्लेख करणे येथे क्रमप्राप्त ठरते त्यात प्रामुख्याने सुरुवातीच्या काळात मुख्याध्यापक म्हणून काम करणारे कै.रानडे सर, कै. आंबेकर सर ,व शाळेस नावलौकिकाच्या सर्वोच्च शिखरावर नेणारे कै.केतकर सर ह्यांचा उल्लेख करावा लागेल पेशाने वकील असणारे केतकर सर विशिष्ट ध्येयाने प्रेरित होवून ह्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावू लागले. (वकील असणारे केतकर सर या शाळेतील पहिले शिक्षक आहेतं व मनमाड मधील सुद्धा ) आणि आपली करडी शिस्त, प्रामाणिकपणा व विद्वत्ता ह्यांचा त्रिवेणी संगम असणाऱ्या कै. केतकर सरांनी दिलेले योगदान मनमाड वासिय कधीच विसरू शकणार नाहीत. मनमाडकरांच्या सांस्कृतिक चळवळीचा केंद्रबिंदू असणाऱ्या "लोकमान्य सभागृहची" निर्मिती केतकर सरांच्य काळात झाली आहे . या नंतर उल्लेख करावा लागेल तो कै.का. का. घुले सरांचा त्यांनीच इंग्रजी माध्यमाचे वर्ग ,व ११ वी १२ वी विभाग सुरू केले. कै. मिसर सर , कै. वसंतराव अहिरे सर , भगत मॅडम, भगत सर , या बरोबरच कै.कीर्तने मॅडम, लाळे सर, ठाकूर सर इ. (उल्लेख करावा लागेल अशी फार नावे आहेत पण जागे अभावी करू शकत नाही)
१९८३ साली एस एस सी परीक्षेत डॉ प्रदीप साळी हे गुणवत्ता यादीत संपूर्ण महाराष्ट्रात २१ वे आले होते तर Dr . Suvarna Barhate ही १०वीत मुलींमध्ये २ री व १२वित देखील गुणवत्ता यादीत आली होती .आभ्यासा शिवाय इतर क्षेत्रात देखील विद्यार्थी नाव लौकिक मिळवून आहेत त्यात उल्लेख करावा लागेल तो डॉ.श्याम चौधरी यांनी नाशिकच्या डॉ. महाजन बंधू सोबत अतिशय खडतर अशी टूर डी अमेरिका ही सायकल स्पर्धा जिंकली होती असा पराक्रम करणारी तो पहिला भारतीय संघ होता ह्याची दखल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "मन की बात" मध्ये घेतली होती. तर सुप्रसिद्ध संगीतकार कुवर हे देखील माजी विद्यार्थी असून ते संगीत क्षेत्रात नवनवीन प्रयोग करत असतात .
३जुलै रोजी शाळेचा ९६ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात येत असून ह्या वर्षी ई १२ विचा निकाल १००% तर ई १० विचा निकाल ९२ % इतका लागला आहे. ह्या वर्षापासून शाळेत डिजिटल पद्धतीने शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात असून त्या साठी करण्यात आलेल्या डिजिटल वर्गाचे उद्घाटन देखील करण्यात येणार आहे. शाळे समोर अनेक आव्हाने अा वासून उभी आहेत त्यांचा मुकाबला करण्यासाठी शिक्षक व संस्थाचालक कटिबद्ध आहेत. समाजातील अनेक मान्यवर माजी विद्यार्थी सातत्याने शाळेच्या पाठीशी उभे आहेत त्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर नवनवीन आव्हाने पेलण्यास शाळा सज्ज आहे व या पुढे देखील उत्तम निकालाची ही परंपरा सुरू राहील हयात शंका नाही .शाळेवर मनमाड वासियांचे नितांत प्रेम आहे व ते शाळेवर विश्वास ठेवून आहेत ही बाब ई 11वी प्रवेशा करिता मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर दिसून येते
वर्धापन दिनानिमित्त माजी विद्यार्थी व शिक्षक म्हणून माझ्या हार्दिक शुभेच्या
- हर्षद रमाकांत गद्रे

 

0 have signed. Let’s get to 100!
At 100 signatures, this petition is more likely to be featured in recommendations!