हा ऐतिहासिक वारसा ...

हा ऐतिहासिक वारसा ...

92 लोगों ने साइन किए। 100 हस्ताक्षर जुटाएं!
शुरू कर दिया
को पेटीशन
Maharashtra government

यह पेटीशन क्यों मायने रखती है

द्वारा शुरू किया गया Priyanka Sarwar

।। जाहीर निषेध ।।

ज्या गडकिल्ल्यांवर पहिली पायरी चढायची तरी आम्ही मंदिरात गेल्याप्रमाणे पाया पडतो , महाराज इथे आले असतील , इथे बसले असतील , इथेच ते असे बोलले असतील असा विचार जरी केला तरी अंगावर काटा येतो.
आणि महाराष्ट्र सरकारने गडकिल्ल्यांबद्दल ३ सप्टेंबरला जो निर्णय मंजूर केला आहे त्याची चिड येण्यापेक्षा सगळ्यांची मने दुखावली गेली आहे असे मला वाटते.
गडकिल्यांचा विकास झालाच पाहिजे पण कसा ?
तिथे रिसॉर्ट आणि लग्नाचे स्पॉट करून का ?
विकास करा ना. नाही कोण म्हणतंय..
१) गडकिल्ल्यांवर घाण होणार नाही याची काळजी घ्या.
२) इतिहासाचे धडे जिथे गिरवले गेले तिथे त्यासंदर्भात माहितीचे पोस्टर लावा. जेणेकरून पर्यटक वर्ग वाढेलच आणि जातांना विचारांनी सुद्धा समृद्ध होऊन जाईल.
३) ज्या ठिकाणी आवश्यक आहे तिथे बांधकाम करा
४) शिवाजी महाराजांच्या , संभाजी महाराजांच्या कथा लावा , तिथे वाचनालय सुरू करा हवे तर.
५ ) शिवचरित्र वेगवेगळ्या पद्धतीने कसे मांडता येईल याचा विचार करा , आजची तरुणाई देखील हे करण्यास समर्थ आहे
६ ) वस्तूंचे , पुस्तकांचे संग्रहालय उभारा
७) गडावरील पक्षीप्राण्यांसाठी सोयी करा
८) गरजूंना रोजगार मिळेल आणि गडाचे सौंदर्य टिकून राहील असा शाश्वत विकास करा
अश्या अनेक गोष्टी करता येतील पण हे काय भलतंच सुरू करायचा निर्णय घेतला आहे.
जिथे आपल्या शिवाजी महाराजांनी कधी स्वतःचे नाव कुठे कोरले नाही तिथे यांना पैसे कमवायचे आहेत का रिसॉर्ट आणि लग्न कार्यालये बांधून ?
ऐतिहासिक वारसेचा असा बाजार नको.
आम्हा महाराष्ट्रीय जनतेला त्या रिसॉर्ट मध्ये मिळणाऱ्या जेवणापेक्षा आज मिळणारी झुणका भाकर जास्त गोडीची वाटेल.
आणि लग्नसमारंभ करण्याची ती मुळीच जागा नाही. तिथे आवाज तुतारी , पोवाडे, ढोलताश्यांचाच घुमला पाहिजे.
महाराष्ट्र सरकारचा न पटलेला निर्णय.
- प्रियंका सरवार
( ६ सप्टेंबर , २०१९ )

92 लोगों ने साइन किए। 100 हस्ताक्षर जुटाएं!