व्यसनमुक्त शिवकिल्ले कायदा

0 व्यक्ति ने साइन किए। 100 हस्ताक्षर जुटाएं!


व्यसनमुक्त शिवकिल्ले कायदा

व्यसनमुक्त किल्ल्यांसाठी वेगळा कायदा पास ह्यवा त्याअंतर्गत

1. किल्ल्यांवर दारू पिणार्यांना, दारू पिऊन नाचगाणे करणार्यांना, तसे करू देणाऱ्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांना व या सगळ्याकडे कानाडोळा करणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई करावी.

2. किल्ल्याना हेरिटेज दर्जा मिळावा .

3. पर्यटन म्हणजे मजा, पर्यटन म्हणजे मस्ती , पर्यटन म्हणजे दारू , पर्यटन म्हणजे मौज म्हणून किल्ले परिसराना पर्यटन क्षेत्र घोषित करू नये, व याआधी केले असल्यास तो आदेश मागे घ्यावेत.

4. किल्ल्याना दिल्लीतील शक्ती धाम, मुंबईतील हुतात्मा चौक याप्रमाणे प्रेरणास्थानाचा दर्जा मिळावा.

5. किल्ल्यांवर लोकांनी शिवाजी महाराज्यांचे चातुर्य , युद्धनीती  शिकायला जावे यासाठी प्रशासनाने गिर्यारोहण मोहिमा, गड माहिती मोहीम व त्या अंतर्गत स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा.

6. गड किल्ल्यांवर रिसॉर्ट , बिअर शॉपी , वाइन शॉप याना परवानगी देऊ नये . याआधी दिली असल्यास तात्काळ मागे घ्यावी.

7 सध्याच्या महाराष्ट्रात एकूण 1200 हुन अधिक किल्ले आहेत. त्यापैकी काही किल्ल्यांवर प्रशासन, स्थानिक गावगुंड, स्थानिक जनता यांनी कायदेशीर व बेकायदेशीर रित्या हक्क मिळवला आहे. प्रशासनाने हे किल्ले शोधून लवकरात लवकर त्यांचे मोजमाप करून त्यांच्या क्षेत्रसीमा निश्चित कराव्यात.     

प्रभाकर ताम्हणकर

9702938521