Stop Renting Forts in Maharashtra - जपूया शिवरायांच्या पाऊलखुणा

Stop Renting Forts in Maharashtra - जपूया शिवरायांच्या पाऊलखुणा

0 व्यक्ति ने साइन किए। 5,000 हस्ताक्षर जुटाएं!
5,000 साइन के बाद इस पेटीशन को स्थानीय मीडिया द्वारा कवर किए जाने की संभावना बढ़ सकेगी!
Supriya Sule ने hon'ble Narendra Modi और को संबोधित करके ये पेटीशन शुरू किया

प्रत्येकाचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातील किल्ल्यांची प्राणपणाने जपणूक केली. या किल्ल्यांच्या रक्षणासाठी आणि शिवरायांनी दिलेल्या स्वराज्याच्या स्वप्नासाठी कित्येक मावळ्यांनी याच किल्ल्यांच्या परिसरात आपल्या रक्ताचं शिंपण घातलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यानंतर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज या दोघांच्याही पाऊलखुणा या गडकोटांवर आहेत. त्यांच्या असामान्य पराक्रम आणि इतिहासाचे पोवाडे गात सह्याद्रिच्या अंगाखांद्यावर मोठ्या दिमाखाने मिरविणाऱ्या या किल्ल्यांचे संवर्धन करण्याची आणि त्याचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे. पण विद्यमान राज्यकर्त्यांनी यातील अनेक किल्ले हेरिटेज हॉटेल्स आणि रिसॉर्ट करण्यासाठी खासगी क्षेत्राला देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यकर्त्यांनी महसूलाच्या वाढीसाठी घेतलेला हा निर्णय शिवप्रेमी नागरिकांच्या भावनांना दुखावणारा आहे. आपणास विनंती आहे की, राज्यसरकारने हा निर्णय मागे घेऊन छत्रपती शिवरायांच्या समाधीपुढे जाहीर माफी मागावी यासाठी ही पिटीशन अवश्य साईन करावी.

0 व्यक्ति ने साइन किए। 5,000 हस्ताक्षर जुटाएं!
5,000 साइन के बाद इस पेटीशन को स्थानीय मीडिया द्वारा कवर किए जाने की संभावना बढ़ सकेगी!