Petition Closed

Action against Corrupt officials because of whom Lt. Ashok Desale took a step of suicide

This petition had 19 supporters


96 वर्षाचे आजोबा.. शंकर लक्ष्मण देसले, मुक्काम- शेलगाव- तालुका- मुरबाड---
यांच्या नावाने असलेल्या जमिनीच्या 7/12 वर मुरबाडच्या तलाठी बाबूनी झोलझाल केली...
4 एकर जागा प्रस्तावित शाई धरणाच्या क्षेत्रात बाधित होत आहे. नोव्हेंबर 2015 पासून तर आता पर्यंत त्यांचा मृत मुलगा अशोक देसले वयवर्षं 61 मुरबाडच्या तहसील कार्यालयात चपला झिजवत होते. अखेर कालच्या सुट्टीच्या दिवशी त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. मुरबाड तहसील कार्यालयाच्या नव्या इमारतीतील गच्चीवरून सकाळी आकरा सवा अकरा च्या वेळात त्यांनी उडी मारून आत्महत्या केल्याचा दुर्दैवी गंभीर प्रकार घडला आणि तालुक्यात खळबळ माजली. दमदार आमदार किसन कथोरे पासून माजी आमदार गोटीराम पवार, सिडकोचे तडफदार माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव असे नेते घटनास्थळी पोहचले. काय घडलं ?,कस घडलं?कोणी केलं,?काय त्रास झाला,?कोण आहेत ? असे 100 प्रश्न या नेत्यांनी उपस्थित केली आणि 4 तास वातावरण गरम केलं.पुढं प्रेत ताब्यात घेतल्य.
मरण पावलेले अशोक देसले यांना 4 भावंड आहेत. सगळे सधन संपन्न आहेत.नोकरदार आहेत.96 वर्षाचे त्यांचे बाबा ही खणखणीत आहेत. फक्त आपल्यावर सरकारी बाबूच्या पेनाने अन्याय केला आणि आपली जमीन भल्याच लोकांच्या घशात जाते त्यांना पचलं नाही.
शहरात गावात 5 फूट जमीन कुठलाही मायका लाल देणार नाही. मग 4 एकर जागेचा बोगस फेरफार कोणी केला ? या मुद्द्यावर देसले कुटुंब महसूल विभागाशी कायदेशीर भांडत होते.
शेवटी या लढ्यात वृद्ध अशोक देसले कालच्या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सरकारी कचेरीत तडफडत मरण पावले आणि आज 11 तारखेला निर्लज्ज मुरबाड तहसील कार्यलयाने त्यांची चूक कबूल करीत देसले यांच्या कुटुंबीयांचा मालकीच्या जमिनीचा 308 क्रमांकाचा फेरफार बोगस असल्याचे प्रांत कार्यालयाला सादर केलेल्या अहवालात कळवले आहे.
किती कसे निष्ठुर असतील महसूल विभागातील अधिकारी एक वयोवृद्ध शेतकरयास स्वतः च्या जमिनीसाठी निष्कारण जीवन संपवयाला मजबूर करताहेत.....

शेतकरी आत्महत्या मुरबाड
आज १५-०५-२०१७ लोकशाही दिनाच्या दिवशी लोकशाही ला काळीमा फासणाऱ्या अधीकाऱ्याच्या निषेधार्थ मुरबाड येथे मोर्चा काढण्यात आला. भाजपा सोडुन सर्व पक्ष कै. अशोक शंकर देसले यानां न्याय मिळावे म्हणुन एकत्र आले. याचा अर्थ काय? भाजपा त्या अधीकाऱ्यांच्या बाजुने आहे का?
की त्याच्यां भ्रष्ठाचारात सहभागी?
देसले आणि अशा अनेक शेतकरी कुटुंबाना न्याय मिळणार नाहीच का?

सरकारने त्या अधीकाऱ्या विरूध्द कारवाई केलीच पाहीजे....Today: Sagar is counting on you

Sagar More needs your help with “Devendra Fadnavis: Action against Corrupt officials”. Join Sagar and 18 supporters today.