Petition Closed

मला न्याय पाहिजे ...!

This petition had 5 supporters


माझी बहीण कै.सौ.अश्विनी क्षीरसागर हिच्यावर अन्याय झाला आहे.अश्विनी हिचा विवाह मुल्हेर येथील डॉ.अशोक क्षीरसागर यांचा मुलगा डॉ.मनोज क्षीरसागर याच्याशी झाला होता.लग्नात क्षीरसागर कुटूंबियांनी जाधव कुटुंबियांकडून १५ लाखाचा हुंडाही घेतला होता. मात्र, लग्नानंतर मनोजची पदवी खोटी असून, तो शासकीय नोकरीला नसल्याचे अश्विनीच्या निदर्शनास आले. क्षीरसागर कुटुंबियांचे पितळ उघडे पडल्याने पती डॉ.मनोज,सासरे डॉ.अशोक, सासू सिंधूबाई क्षीरसागर यांनी अश्विनीला मारहाण केली जात असे हॉस्पिटलच्या बांधकामासाठी माहेरून ४० लाख रुपये घेऊन येण्याचा तगादाही लावला.अश्विनी नाशिक येथे कोर्ससाठी माझ्याकडे असताना,सासरच्या मंडळींनी पुन्हा तगादा लावला. या त्रासाला कंटाळून तिने 27/02/2017 रोजी मी घरी नसताना ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पैश्यांचा दम दाखून हे आरोपी फिरत आहेत. लोकांनो आज माझ्या बहिणीवर वेळ अली उद्या दुसऱ्या कोणावर येऊ शकते. एका गरीब मुलीचा जीव घेतला ह्या लोकांनी.आयुष्य एकदाच भेटत. ते ह्या लोकांनी हिरावून घेतलं. ह्या आरोपीना सजा ही झालीच पाहिजे.तेव्हाच तिला आणि तिच्या सारख्या मुलींना न्याय भेटेन. लाज वाट्याला पाहिजे लोकांना.

तर माझी सरकारकडे एकच विनंती आहे ह्या आरोपीना फाशीची शिक्षा द्या.......Today: Lopamudra is counting on you

Lopamudra Jadhav needs your help with “Devendra Fadnavis: मला न्याय पाहिजे ...!”. Join Lopamudra and 4 supporters today.