To remove illegal Encroachment by Zilla Parishad on Bajiprabhu's Deshpande's Birth Place

0 व्यक्ति ने साइन किए। 100 हस्ताक्षर जुटाएं!


    विषय: वीर  रत्न बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू देशपांडे ह्यांच्या ३59 व्या  पुण्यतिथी पूर्वी त्यांचे जन्म स्थान पारडे नं -२, गाव  शिंद , ता.  भोर, जिल्हा पुणे हे ऐतिहासिक वास्तू  तथा राष्ट्रीय स्मारक व पर्यटन स्थळ  म्हणून आपल्या अधिकारात  घोषित  करून मिळण्याबाबत, तसेच बाजीप्रभू देशपांडे ह्यांच्या नावाने पोस्टाचे (जन्म १ जुन १६१५- १३ जुलै १६६०) तिकिट मिळण्याबाबत .

      महोदय, वीर रत्न बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू देशपांडे हे १३ जुलै १६६० रोजी छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचे प्राण वाचवताना स्वराज्याच्या कामी आले. बाजीप्रभू देशपांडे ह्यांचा जन्म पारडे नं -२, गाव  शिंद , ता.  भोर, जिल्हा पुणे येथे झाला. सदर परडे नं -२ हे २.9 एकर मध्ये असून बाजीप्रभू  ह्यांचे निवास स्थान होते. बाजींच्या आणि फुलाजींच्या मृत्यू नंतर छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या आई चे  सांत्वन करण्यासाठी ह्या वस्तू मधून येऊन गेल्याचे ही उल्लेख आहेत.

 काही लोकांनी तिथे शौचालये बांधून ह्या पवित्र जागेचा एक प्रकारे अपमानच केला आहे. ह्या जागे मध्ये वीर रत्न बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू देशपांडे ह्यांच्या जिवनावर तैलचित्र , सांस्कृतिक भवन तसेच समाधी बांधण्याचे वरील ट्रस्ट ने ठरिवले होते.

सन १९९९  पासून आम्ही हे स्मारक करण्याच्या दृष्टीने खूप वेळा अनेक मुख्यमंत्र्यांकडे गेलो. पण सर्व काही व्यर्थ. फक्त अहवाल सादर करण्याचेच आदेश.

माननीय  मुख्यमंत्री श्री देवेन्द्रजी फडणवीस  ह्यांची २०१४ रोजी प्रत्येक्ष भेट घेतली. तसेच सांस्कृतिक मंत्री श्री विनोदजी तावडे ह्यांसकडे देखील प्रत्येक्ष भेट घेतली पण असं पुन्हा  अहवाल सादर करण्याचेच आदेश.

मान. शिवशाहीर  बाबासाहेब पुरंदरे ह्यांनी काही महिन्यांपूर्वी  हे वरील स्मारक त्यांच्या हयाती मध्ये व्हावे असे बोलून दाखवले होते . तीच इच्छा आमचाही सर्व  वारसांची आहे. असे न झाल्यास वीर रत्न बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू देशपांडे ह्यांनी  १३ जुलै १६६० रोजी छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचे प्राण वाचवताना स्वराज्याच्या साठी दिलेले बलिदान व्यर्थ जाईल.

.

पुणे ज़िल्हा परिषद ह्यांच्या संमतीने  वीर  रत्न बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू देशपांडे ह्यांच्याजन्म स्थान परडे नं -२, गाव  शिंद , ता.  भोर, जिल्हा पुणे हे ऐतिहासिक वास्तूवर शौचालय, अनधिकृत बांधकामे केली आहेत.  पुणे ज़िल्हा परिषद आणि महसूल खाते ह्यांनी ह्या आधी पासूनच ही जागा बळकावण्याचा कट रचला होता कारण ही जागा कुठेही उपलब्ध नाही असे महसूल खात्याकडून प्रमाणपत्र देण्यात आले. 

 पुणे ज़िल्हा परिषद ह्यांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून  जागेवर अनधिकृत बांधकामे केली आहेत. तरी आमची विनंती आहे कि  बांधून देण्यात आलेली अनधिकृत  शौचालय, अनधिकृत  बांधकामे त्वरित काढून,  बांधून देणाऱ्या  संबंधित शासकीय व अशासकीय  अधिकारी ह्यांच्यावर त्वरित अतिक्रमणाचा व कट कारस्थान करून जागा बळकावण्याचा   गुन्हा  दाखल करावा.

आम्ही आपल्या कडे एक प्रखर हिंदुत्ववादी व खऱ्या अर्थाने देशाची संस्कृती जपणारे  पंतप्रधान म्हणून पाहतो.  तरी आमची अशी इच्छा  आहे की आपण आपल्या अधिकार मधेच वीर रत्न बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू देशपांडे ह्यांच्या ३५9 (१३ जुलै २०20) व्या  पुण्यतिथी पूर्वी त्यांचे जन्म स्थान पारडे नं -२, गाव  शिंद , ता.  भोर, जिल्हा पुणे हे ऐतिहासिक वास्तू  तथा राष्ट्रीय स्मारक व पर्यटन स्थळ  म्हणून   घोषित  करून निधी देऊन , तसेच बाजीप्रभू देशपांडे ह्यांच्या नावाने पोस्टाचे (जन्म १ जुन १६१५- १३ जुलै १६६०) तिकिट व बाजीप्रभू देशपांडे ह्यांची छाप असलेली नाणी चलना मध्ये आणावे  .   सरकार तर्फे यथोचित स्मारक उभारून ह्यां दोन्ही योध्यांचा सन्मान करावा.