Close MahaPortal - महापोर्टल तातडीने बंद करा

Close MahaPortal - महापोर्टल तातडीने बंद करा
यह पेटीशन क्यों मायने रखती है

महापरीक्षा पोर्टलमुळे होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी हे पोर्टल बंद करण्यात यावे, अशी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्वच युवक- युवतींची एकमुखाने मागणी आहे. तसेच, पुढे होणाऱ्या परीक्षा या एमपीएससी च्या यंत्रणे मार्फतच घेतल्यास हुशार, गरीब आणि होतकरू मुलांना योग्य न्याय देता येईल.
मागील( भाजप) राज्य सरकारकडूनकडून सरकारी पद भरतीसाठी तयार केलेल्या महापरीक्षा पोर्टल कडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये फक्त आणि फक्त सावळा गोंधळ चालू आहे. यामध्ये, सामूहिक कॉपी, अभ्यासक्रमानुसार परीक्षा न होणे, प्रश्नांची पुनरावृत्ती होणे, परीक्षेत मोबाइल; तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करणे, योग्य बैठक व्यवस्था नसणे, वेळेवर परीक्षा न होणे, हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने न होणे, डमी उमेदवारांना पकडल्यानंतर कोणतीही कारवाई न होणे अशा अनेक घटनांमुळे महापरीक्षा पोर्टलचा भ्रष्ट कारभार महाराष्ट्रासमोर आला आहे. म्हणून हे पोर्टल तात्कळ बंद करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे
त्यामुळे, महापरीक्षा पोर्टल रद्द करून सर्व परीक्षा एमपीएससी मार्फत घेऊन महाराष्ट्रातील होतकरू युवक- युवतींचे होणारे प्रचंड नुकसान लवकरात लवकर थांबवावे
All youth, who are preparing for the competitive exams are demanding that the Mahapariksha portal must be closed immediately to prevent malpractices which are damaging future of students. Fair justice can be given to intelligent and meritorious students of Maharashtra if the exams are taken by MPSC Mechanism only.
It has been come to notice that there are many cases of scam, blatant mismanagement & corrupt practices in the newly-formed Examination Portal (MahaPariksha Portal) By MahaIT contracted by the previous Maharashtra state government for the recruitment of state government posts. These cases include group copy, out of syllabus questions in the paper, repetition of questions, invalid use of mobile device & allied electronic devices in the exam; lack of proper seating arrangement, improper time management at the time of examination, misuse of biometric system, no action on the dummy candidates etc. The cases which have come to the notice of people underlines the corruption done by the Portal.
Therefore, We should discard the Maha pariksha Portal and conduct all our exams via regular MPSC Mechanism