Support GoaMiles

0 व्यक्ति ने साइन किए। 15,000 हस्ताक्षर जुटाएं!


गोवा हे पर्यटन केंद्र असल्याने बाराही महीने पर्यटकांचा ओघ इथे सुरु असतो. बरेच प्रवासी इथल्या टैक्सी सेवेवर अवलंबून असतात पण टैक्सी-चालकांच्या मनमानीपणे पैसे लाटण्याच्या सवयीमुळे गोव्याचे नाव बळी पडत आहे. खासकरून दाबोळी विमानतळ, लोकल टैक्सी स्टॅण्डस् इथे टैक्सी सेवेचे कसेही भाड़ेे घेतले जातात. ह्यावर आळा बसावा म्हणून सरकारने गोमंतकीय स्टार्टअप सोबत भागेदारी करुन गोवा माइल्स ह्या मोबाइल ऐप्लीकेशनची निर्मिति केली जेणेकरुन प्रवाश्यांना टैक्सी सरकारने वैध ठरविलेल्या भाडेदरावर ऑनलाइन आरक्षित करता येते.

गोवा माइल्सला अगदी पहिल्यापासून, म्हणजे 6 ऑगस्ट 2018 मध्ये सुरु झाल्यापासून स्थानिक टैक्सी-चालक आणि राजकारण्यांकडून विरोध पत्करावा लागला आहे तरीसुद्धा ह्याला त्यानी समर्थपणे तोंड दिलं आहे.

सध्या गोवा माइल्सला पुढील समस्यांना सामोरे जावे लागत आहे :

तथाकथित बातमी ज्यात असे दर्शविले गेले की गोवा माइल्स मधे बिगर-गोमंतकियांना चालक म्हणून नेमले जाते.
गोवा माइल्सला विरोध करणाऱ्या राजकारण्यांचा वरदहस्त लाभलेल्या स्थानिक टैक्सि चालकांनी संबंधित सेवेच्या गाड्यांना नुकसान पोहोचवले आहे जेणेकरुन गोवा माइल्स च्या चालकांत भय निर्माण व्हावे.

हि चुकीची बातमी केवळ काही लोकांनी पसरवुन चांगल्या गोष्टिंवर पांघरुण घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ह्या वेळी वाइटाला बाहेर फेकून देण्याची गरज आहे आणी ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा आम्ही सर्व एक राज्य, एक समाज आणी एक कुटुंब म्हणून एकत्रित उभे राहु. गोमंतकीय लोकांचा आवाज आता दुर्लक्षुन चालणार नाही. आमच्या सोबत गोव्याला एक सुशासित राज्य बनविण्याच्या आमच्या प्रवासाला साथ द्या.
सोबत आम्ही हे साध्य करू!

#गोआ माइल्सला साथ द्या. प्रत्येक स्वाक्षरी गोव्याच्या सुभवितव्यासाठी निर्णायक ठरेल.

गोवा माइल्स बाबत आणखी माहितीसाठी GoaMiles च्या इंस्टाग्राम आणि फेसबुक संकेतस्थळांना भेट द्या.

गोव्या बद्दल :

गोवा हे भारताच्या उत्तर-पच्छिम किनाऱ्यावर वसलेले एक छोटेसे राज्य आहे. 2011 च्या जनगणनेनुसार ह्या राज्याची लोकसंख्या 1,458,545 आहे. हे राज्य राष्ट्रिय तसेच आंतर-राष्ट्रिय पर्यटनाबाबतीत अग्रेसर आहे.