Petition Closed

क्रिमिलेअर तत्वांतून "कुणबी" जातीला वगळण्याबाबत .

This petition had 302 supporters


Letter Attached

1 , 2 , 3 , 4 , 5 , 6 , 7 , 8 , 9 , 10 , 11 

 मा. सहसचिव,

विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग,

दालन क्र १५३, मंत्रालय, मुंबई..

 

आक्षेपकर्ता - ईमेल कर्ता.

 

विषय - क्रिमिलेअर तत्वांतून "कुणबी" जातीला वगळण्याबाबत.

संदर्भ -  मा. सु. अ. पेडगावकर, यावर सचिव, यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्धीस दिलेले घोषणापत्र

  

महोदय,

       मा. महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगाने दिनांक २८ ऑक्टोबर २०१४ ला शासनाकडे अहवाल क्रमांक ४९ सादर केल्याचे संदर्भित नुसार कळते आहे. त्या अहवालात राज्यातील १०३ जातींना "क्रिमिलेअर" तत्त्वातून वागल्याचे समजते. त्यात राज्यातील "कुणबी" या जातीचा उल्लेख नसल्याची माहिती आहे. तशा प्रकारचे वृत्त लोकसत्ता (९/१०/२०१७४) आणि सकाळ (२३/१०/२०१७) या दैनिकात प्रसिद्ध झाले आहे. त्याबाबत मी माझा आक्षेप नोंदवीत आहे.

    कुणबी समाज (ज्यात अनेक पोटजाती आहेत) हा महाराष्ट्र राज्यामध्ये पूर्वीपासून शेतीशी निगडित समाज असल्याने तो आर्थिक व सामाजिकदृष्ट्या पूर्णपणे मागासलेला आहे. शेती आणि शेतमजूर हाच पूर्वपार चालत असलेला कुणबी समाजाचा व्यवसाय आहे. कोणत्याच संदर्भाने महाराष्ट्रातील कुणबी समाज संपन्न किंवा वैभवशाली जीवन जगत नाही हे वास्तव आहे.

     इतर मागासवर्ग प्रवर्गातील कुणबी जात समूहासह इतर सर्व जातिसमूहाला क्रिमिलेअर अट शिथिल होण्याबाबत निर्णय व्हावा. OBC समूहासाठी ठेवण्यात आलेली क्रिमिलेअर ही अट काढावी व सदरची अट "कुणबी" जातीला असू नये, करिता माझा आक्षेप मान्य करून, कुणबी जातीला क्रिमीलेअर अटीतून वगळावे, अशी विनंती करण्यात येत आहे.

         सविनय सादर..

       आपला नम्र-     

       ईमेल कर्ता.Today: Vinayak is counting on you

Vinayak Gotarkar needs your help with “bhaurao.gavit@nic.in: क्रिमिलेअर तत्वांतून "कुणबी" जातीला वगळण्याबाबत .”. Join Vinayak and 301 supporters today.