गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यात यावी..?

गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यात यावी..?

0 have signed. Let’s get to 100!
At 100 signatures, this petition is more likely to be featured in recommendations!
Sumit Pakalwar started this petition to Anil Deshmukh and

1992 मध्ये गडचिरोली जिल्ह्यात काही सामाजिक व राजकीय व्यक्तींच्या मागणीमुळे तत्कालीन राज्यसरकारने गडचिरोली  जिल्ह्यात दारूबंदी केली. मात्र, आज 28 वर्षानंतर जिल्ह्यातील दारूबंदीची स्थिती दयनीय असून प्रत्येक गावात अवैध दारूविक्री चालू असल्याचे चित्र आहे. दररोज वर्तमानपत्रात अवैध दारूसाठा किंवा तस्करी करणारे पकडल्याची बातमी असतेच. विषारी व बनावट दारू पिल्यामुळे अनेकांचा जीव जात आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तो वेगळा. मग या दारूबंदीतुन काय साध्य झाले? हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

मुळात गडचिरोली सारख्या विरळ लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यात दारूबंदीची वेळ का यावी हे देखील अनुत्तरीत कोडे आहे. यामुळे कोट्यवधींचा महसूल बुडाला, थोड्या अधिकप्रमाणात रोजगार निर्मिती झाली असती ती देखील झाली नाही. उलट ज्या ठिकाणी अधिक खप आहे अशा जिल्ह्यात दारूविक्री सुरु आणि गडचिरोली सारख्या मागास जिल्ह्यात बंदी हा दुजाभाव का?  शेवटी दारू पिणे वाईटच.. पण ती अवैधपणे ज्यादा पैसे देऊन पिल्या जातं असेल तर ते त्याहून वाईट.

दारू पिणे किंवा न पिणे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र, जर दारूविक्री सुरु झाल्यास जिल्ह्याचा आर्थिक विकास होत असेल तर यात वाईट का?  असा प्रश्न आता विचारल्या जात आहे. आता जिल्ह्यातीलच जनता या 'ऑनलाईन पिटिशन' च्या माध्यमातून ठरवेल काय योग्य ते.... !

0 have signed. Let’s get to 100!
At 100 signatures, this petition is more likely to be featured in recommendations!