Petition Closed

Save Farmers

This petition had 6 supporters


सर्वांना माहितच आहे कि, आपला देश हा कृषी / शेती प्रदान देश आहे. परंतु काही काळापासून सर्वानीच शेतीकडे दुर्लक्ष केलेले आहे, असे दिसते आहे. त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पाणी. आपल्या देशात एखाद्या राज्यात जास्त पाऊस पडतो तर काही भागात कमी पाऊस पडतो तर काही भागात अत्यंत थोडा तर काही भागात पाऊसच पडत नाही. जास्त पडल्यामुळे पिके जातात तसेच पाण्याच्या आभावीही पिके जातात. त्यामुळेच काय तर आजचा बहुतेक तरुण वर्ग शेतीकडे कमी आणि नोकरीकडे जास्त आकर्षित झालेला दिसतो आहे आणि त्याचे मूख्य कारण म्हणजे पाण्याची कमतरता.

शेतीसाठी पाणी नाही त्यामुळे उत्पन्न नाही तसेच शेतकरी कर्ज काढतात आणि काढलेले कर्ज फेडायला येत नाही म्हणून शेवटचा पर्याय निवडतात तो म्हणजे आत्महत्या.

जर आपल्या देशाला खरेच कृषी प्रदान देश बनवायचे असेल तर, ही परिस्थिती बदलावी लागेल. फक्त कर्जमाफी देवून किंवा शेत मालाला हमी भाव देवून ही परिस्थिती बदलणार नाही. त्यासाठी आपल्या देशाच्या सर्व भागात मुबलक पाणी पुरवठा असला पाहिजे आणि त्यासाठी ज्या भागात जास्त पाऊस पडतो तसेच ज्या भागात पूर परिस्थिती येते, त्या भागातील पाणी इतरत्र वळविले पाहिजे आणि हे सर्व साध्य होणार आहे नदी जोड प्रकल्पाने. कारण जर सर्व भागात पाण्याचा व्यवस्थित आणि मुबलक पाणी पुरवठा झाला, तर आपली शेती चांगली पिकेल आणि शेती चांगली पिकली कि, शेतकरी यांना उत्पन्न चांगले उत्पन्न मिळेल आणि पर्यायाने त्यांना चांगले पैसे मिळतील. त्यामुळे आजून लोक तसेच तरुण वर्ग शेतीकडे वळतील आणि आपला देश पुन्हा एकदा कृषी प्रदान देश खऱ्या अर्थाने बनेल.

माझी या पिटीशनने भारत सरकार तसेच महाराष्ट्र सरकार यांस विनंती आहे कि,  नदी जोड प्रकल्पाचे काम लवकरात लवकर हाती घ्यावे आणि युद्ध पातळीवर ते काम लवकरात लवकर पूर्ण करावे.

चला मला सपोर्ट करा, आपल्या देशाला पुन्हा एकदा "सुजलाम सुफलाम" तसेच कृषी / शेती प्रदान देश बनवायला.

चला पुन्हा बनवूया आपल्या देशाला कृषी / शेती प्रदान देश. चला वाचवूया आपल्या शेतकरी बांधवाना.

!!जय जवान, जय किसान!! हा नारा खरा ठरवूया आणि सत्यात आणूया.

दत्तात्रय विलास पवार,

महाराष्ट्र,Today: Dattatraya is counting on you

Dattatraya Pawar needs your help with “भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार: Save the Farmers”. Join Dattatraya and 5 supporters today.