जनता कि आवाज

जनता कि आवाज
Why this petition matters
ठाणे येथील सेट्रिक अँथोनी आयझॅक व त्यांच्या कुटुंब हे गुन्हेगार आसून तसेच तो एक राजकीय पक्षाचा पद अधिकारी आहे.ठाणे मधील धर्मवीर नगर येथे शासनाने बांधून दिलेल्या M.M.R.D.A घरामधून तो दहा वर्ष झाले आर्थिक लुटपात करत आहे. त्याच्या पूर्ण कुटुंबावर मानपाडा पोलीस स्टेशन मधे गुन्हे दाखल आहेत. विरोधात आवाज उठिणाऱ्या काही महिला व स्थानिक नागरिकांवर दमदाटी व दबाव टाकून आवाज दबवण्याचा प्रयंत करत आहे. जवळपास ९० लाखाचा घोटाळा तेने केल्याचा निदर्शनात आणून दिले असुन सुधा पोलिस प्रशासन व काही अधिकारी त्याला पाठीशी घालत आहे. तेथील नागरिकांच्या समस्या तुम्ही न्यूज वर बघू शकता.
1 https://fb.watch/dcO6Y6OfwZ/
2. https://fb.watch/dcEOX9tXVw/
3. https://fb.watch/cvsv0TFbvk/
श्री. प्रताप. को-ऑप-हौ- सोसायटी,
ईमारत क्रमांक.१५, बी.एस.यु.पी. प्रकल्प,
धर्मवीर नगर, तुळशीधाम रोड,
ठाणे, (प.) पिन कोड:-४००६१०.
दिनांक:-
प्रति,
मा.सहाय्यक पोलिस उपायुक्त,
ठाणे शहर, ठाणे.
विषय:- सोसायटीचे चेअरमन यांनी २०१२ पासुन ते २०२२ पर्यंत गेल्या १० वर्षांचा भ्रष्टाचार, आर्थिक गैव्यवहारप्रकरणी व मानसिक त्रासाबद्दल न्याय मिळवून देण्याबाबत.
महोदय,
आम्ही श्री. प्रताप. को-ऑप-हौ- सोसायटी, इमारत क्रमांक.१५, बी.एस.यु.पी. प्रकल्प, धर्मवीर नगर, तुळशीधाम रोड, ठाणे, (प.) येथे राहणारे सर्व रहिवासी आपणांस विनंतीपुर्वक अर्ज करतो की, आम्ही श्री. प्रताप. को-ऑप-हौ- सोसायटीमधे एकुण तळ+८ मजली इमारतीत ८८ सदनिकाधारक असुन आम्ही २०१२ पासुन ते २०२२ पर्यंत गेले १० वर्षे श्री. प्रताप. को-ऑप-हौ. सोसायटी, इमारत क्रमांक.१५ मध्ये राहत आहोत.
आम्ही श्री. प्रताप. को-ऑप-हौ. सोसायटीमधील सर्व सभासद आपणांस सांगु इच्छितो की, सदर सोसायटीचे माजी. चेअरमन श्री. सेट्रीक अँथोनी आयझॅक आहेत. हि व्यक्ती सदर सोसायटीमधील लोकांना खुप त्रास देत आहे. त्यांचा संपूर्ण परिवार यात सहभागी आहे. हा माणूस महिलांना धमकी आणि शिवीगाळ करत असतो. आम्हाला खूप त्रास देत आहेत. तसेच सोसायटीच्या मेंटेनन्स मधील पैशाचा २०१२ ते २०२२ पर्यंतचा मागील १० वर्षांचा हिशोबसहित अहवाल मागितल्यास तो हिशोब देत नाही आहे. सदरची तक्रार दाखल करण्यासाठी स्थानिक पोलिस स्टेशन चितळसर-मानपाडा, ठाणे येथे तक्रार दाखल करण्याकरिता गेलो असता तेथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक. तक्रार दाखल करून घेण्यास नकार देत आहेत व गुन्हेगारास पाठीशी घालत आहेत आणि आपले कर्तव्य पार पाडत नाही आहेत. तरी आम्हाला सोसायटीच्या आर्थिक गैर्यवहारप्रकरणी न्याय मिळवुन देण्यात यावा.
चेअरमन यांनी दिलेल्या त्रासाबद्दलची करणे आम्ही खालीलप्रमाणे लिहित आहोत या चेरमनचा सदर इमारतीमध्ये लोकांना किती त्रास होत आहे.
१. महिलांना नेहमी अपशब्द वापरतो त्यांचे कुटुंब त्यामध्ये सहभागी असतात.
२. चेरमन स्वतः अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सेक्रेटरी सर्व पदावर दादागिरी करून एकटाच पदावर आहे.
३. इमारतीमध्ये लिफ्ट दुपारी २ ते ५ आणि रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवतो.
४. इमारतीमध्ये स्वतः भाडोत्री ठेवतो आणि त्यांच्याबरोबर भांडण करतो आणि त्यांना धमकी देऊन काढून टाकतो आणि त्यांना धमकी देतो परत सोसायटी मध्ये यायच नाही.
५. सोसायटी मध्ये दादागिरी शिवाय काहीच नाही लोक घाबरून राहतात.
६. लोकांना मेंटेनन्स भरायचा होत नाही आणि हा माणूस सोसायटी मध्ये काही ना काही काम काढून हे करायचे आहे ते काम करायचे आहे म्हणुन सर्व सभासदांनी सांगु हा एवढे पैसे भरायचे आहे टेरेसवर शेड लावायचे आहेत म्हणुन रूपये ९,५१,७५०/- एवढी रक्कम आणि ज्यांनी भाडोत्री ठेवले आहे त्यांच्याकडून रू.२५,०००/- इतकी रक्कम मागत आहे. टेरेसवरती प्लमबिंग कामासाठी रू.३,५०,०००/- एवढे रक्कम सांगत आहे लोक एवढे पैसे कुठून अणणार.
७. चेरमनने स्वतःचा घरा समोर लाकडी कंपाउंड लावले आहे.
८. सोसायटीचे सी. सी.टीव्हीचे सर्वर चेरमनने स्वतःच्या घरी ठेवले आहे दिवस रात्र त्यांचे कुटुंब आणि स्वतः दिवसभरात कोण येत कोण जाते, कोणी कसे कपडे घातले आहे तेच बघत असतात. सी.सी. टीव्हीचे फुटेज चेरमन शिवाय इतर कोणीही बघायचे नसते तरीही घरातले सर्व बघत बसतात.
९. सोसायटीच्या वॉचमनला गुलाम बनवून ठेवले आहे तो सोसायटीची काम कमी करतो त्यांचे पर्सनल कामे जास्त करत असतो.
१०. २४ तासासाठी एकच वॉचमेन ठेवला आहे. सर्व सभासद सांगतात दोन वॉचमन ठेवायचे तर हा माणूस दादागिरीने नाही ठेवणार बोलतो.
११. फ्लॅट क्रमांक. ८०३ मध्ये राहणार रिचा प्रजापती व त्यांच्या पती यांना सर्वांसमोर धमकी देतो तुम्हाला या सोसायटी मधून काढून टाकणार.
१२. टेरेसवर बेकायदेशीर बांधकाम केले आहे त्यात त्यांचे मुले स्टाईलीन आणि मार्टिन आयझेक अवैध कामे (दारू, हुक्का पार्लर) करत असतात आणि तिथे कोणाला जाण्याची परवानगी नाही.
१३. दिनांक.२९/०५/२०२२. रोजी. सायंकाळी ठिक ०६:०० वाजताच्या सुमारास काही गुन्हेगारी प्रवृत्तीची १० ते १२ व्यक्ती सदर गुन्हेगारांच्या घरी भेट देऊन गेले आहेत.
तरी आम्हाला वरील विषयास अनुसरुन होणाऱ्या त्रासापासुन व अन्यायापासुन न्याय मिळवुन देण्यात यावा.
ही आपणांस नम्र विनंती आहे.
आपला विश्वासू,
श्री. प्रताप. को-ऑप-हौ- सोसायटी.
सौ.रूपा गणेश पवार.
(अध्यक्ष)
श्री. रवी रेड्डी.
(उपाध्यक्ष)
सौ.माया अनंत साळवे.
(सेक्रेटरी)
श्री.संजय रामभाऊ मोघे.
(खजिनदार)
टीप:- अर्जासोबत गुन्हेगारांच्या नावांची यादी जोडत आहोत.
*स्थानिक पोलीस प्रशासन पाठीशी घालत असलेल्या गुन्हेगारांची नावे व दाखल असलेले गुन्हे खालील प्रमाणे आहेत:-*
१.श्री.सेट्रिक अँथोनी आयझेक.( *कलम ५०९* अंतर्गत गुन्हा दाखल आहे.)
२.सौ.मंगल सेट्रिक आयझेक.
३.श्री.स्टॅलिन सेट्रिक आयझेक.
४.श्री.मार्टिन सेट्रिक आयझेक.( *कलम ३०७* अंतर्गत गुन्हा दखल आहे.)
५.सौ.अंकिता स्टॅलिन आयझेक.
*यापैकी क्रमांक.१चे गुन्हेगार यांच्यावर मानपाडा पोलीस स्टेशन व नौपाडा पोलीस स्टेशन येथे विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आणि क्रमांक.४ चे गुन्हेगार जीवे मारण्याची धमकी देत असून, कलम ३०७ सारखे अजून गुन्हे स्वतःहवर दाखल करून घेण्याची तयारी दाखवत आहेत. यांच्यावर कलम ३०७ सारखा गंभीर गुन्हा दाखल आहे. तरी या गुन्हेगारांपासून सोसायटीतील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे.*
वरील ५ ही गुन्हेगारांना चितळसर-मानपाडा, पोलीस स्टेशन, ठाणे. येथे कार्यरत असलेले
*वरिष्ठ पोलीस निरिक्षक. श्रीमती. सुलभा पाटील. व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी पाठीशी घालत आहेत.*
*सदर गुन्हेगारांवर येत्या ७ दिवसांच्या कालावधीत योग्य ती कार्यवाही न झाल्यास, ठाणे शहर विधानसाभा मतदार संघाचे आमदार.माननीय.श्री. संजयजी केळकर. साहेब. व भाजपा ठाणे शहर अध्यक्ष. श्री. रमेशदादा आंब्रे. साहेब. यांच्या नेतृत्वात पोलीस प्रशासनाविरोधात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी आंदोलन करण्यात येईल.